HW News Marathi
मुंबई

नवी मुंबईत गगनचुंबी इमारतीला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही

नवी मुंबई | नवी मुंबईतील सीवूड्स येथील सेक्टर ४४ मधील सी होम्स इमारतीच्या २१व्या मजल्यावर आज (८ फेब्रुवारी) सकाळी ७ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत अग्निशामन दलाचे ७ जवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी वाशीतील एम.जी.एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, इमारतीला लागलेल्या भीषण आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आज सकाळी ७ च्या सुमारास नेरुळमधील सीवूड्स सेक्टर ४४ मधील सी होम्स या इमारतीच्या १८ व्या आणि १९व्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. मात्र इमारतीला लागलेली ही भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. इमारत गगनचुंबी असल्याकारणाने आग वेगाने पसरत होती तसेच आग विझवताना अग्निशमन दलाचे ७ जवान जखमी झाले. अखेर ३ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांअंती अग्निशामन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान, आग लागल्याचे लक्षात येताच ताबडतोब इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाबासाहेबांना अनोख अभिवादन

News Desk

आता नवरात्रोत्सवाला ऑनलाईन परवानगी

swarit

परिवहन मंत्री राजीनामा द्या,एसटी संपातील वाहकाचा मृत्यू हा सरकारच्या दडपशाहीचा बळी!: विखे पाटील

News Desk