HW News Marathi
मुंबई

नऊ तासांत तिनशे मिलिमीटर पाऊस

मुंबई- मुंबई परिसर व उपनगरांमध्ये मंगळवारी सकाळी साडे आठ ते सायंकाळी साडे पाच या ९ तासांत तब्बल तिनशे मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना २६ जुलैची पुन्हा एकदा आठवण झाली. याचवेळी कुलाबा वेधशाळेत दिवसभरात ६५ मिमी पावसाची नोंद झाली होती. सांताक्रुझ येथे दुपारी अडीच वाजेपर्यंत १२६ मिमी पाऊस झाला होता. त्यानंतरच्या ३ तासात तब्बल १७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंतचा हा बहुदा विक्रमी पाऊस असू शकतो. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासात कुलाबा १५१.८, सांताक्रुझ ८८.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. तसेच डहाणु, तलासरी १९०,हर्णे १८०, महाबळेश्वर १७०, अलिबाग १६०, वलसाड, अकोला ७०, पेण २६०, म्हसाळा, मोखेडा २१०, जव्हार २००, मंडणगड, उरण १७०,माथेरान, रोहा, शहापूर १४०, अंबरनाथ, गुहागर, कल्याण, मुरबाड, मुरुड, उल्हासनगर, विक्रमगड १३०, चिपळूण, खेड, पनवेल, पोलादपूर,संगमेश्वर देवरुख १२०, ओझरखेडा १४०, मोहोळ १००, विदर्भातील अकोट १००, अर्जुनी मोरगांव, लाखंदूर, लाखानी, मोहाडी, पुसद ९० मिमी पाऊस झाला.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांनी अत्यंत गरजेचे काम असेल तर घराबाहेर पडा, असे आवाहन केले आहे. सोबतच लोकांनी वाहतूक विभागाचा आदेश पाळण्याची विनंतीही केली आहे. मुंबई पोलिसांनी ट्विट किंवा फोन केल्यास पोलीस मदतीला धावून येतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

रेल्वे सेवा ठप्प- मुंबई आणि उपनगराला सकाळपासून पावसाने झोडपलं असून रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प पडली आहे. दरम्यान मुबईकरांसाठी नेहमी धावणा-या डबेवाल्यांनाही पावसाचा फटका बसला आहे. पावसामुळे मुंबईच्या डबेवाल्यांची डबे पोहचवण्याची सेवा विस्कळीत झाली आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याने डबेवाले जागोजागी अडकुन पडले आहेत अशी माहिती मुंबई डबेवाला असोशिएशन प्रवक्ता सुभाष तळेकर यांनी दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दाऊदच्या टोळीतील गँगस्टर ‘महाडिक’ अखेर पोलिसांच्या ताब्यात

News Desk

मनोज मेहता यांचा मृत्यू, अंधेरी पुल दुर्घटनेत झाले होते जखमी

News Desk

राज ठाकरेंनी नाकारले चांदीचे सिंहासन

swarit