HW News Marathi
मुंबई

ओला-उबरचा संप अखेर मागे

मुंबई । गेल्या १२ दिवसांपासून ओला-उबरचा सुरू असलेला संप अखेर चालकांनी मागे घेतला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर ओला-उबर चालकांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. ओला-उबर व्यवस्थापनाकडून असमाधानकारक व्यवसाय मिळत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या नेतृत्वाखाली हा संप सुरू होता.

२२ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी ओला-उबर व्यवस्थापन आणि संघाचे प्रतिनिधी यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. यामध्ये ओला-उबर व्यवस्थापनाने चालकांना प्रति किलोमीटर दरवाढीसह सुमारे ८० टक्के मागण्या मान्य केल्या होत्या. यात कमिशन वजा न करता प्रति किलोमीटरमागील दरात वाढ करण्यात आली होती. शिवाय नव्याने लीज कॅब भाडेतत्त्वावर घेण्यात येणार नाही, रायडिंग टाइमसाठी प्रति किलोमीटर दीड रुपये देणे या आणि अशा अन्य मागण्या ओला-उबर व्यवस्थापनाने मान्य केल्या. मात्र याबद्दल लेखी आश्वासन मिळत नसल्यामुळे अ‍ॅप बेस्ड टॅक्सी चालक-मालकांनी संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

या संपात सुमारे ५० हजार अ‍ॅप बेस्ड टॅक्सी चालक-मालक सहभागी झाले होते. या प्रकरणी सरकारने दोन दिवसात तोगडा न काढल्यास ५ नोव्हेंबरला लालबाग ते मंत्रालय पायी धडक मोर्चा काढून मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा संघाने २ नोव्हेंबरला दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

प्रभावशाली, प्रगत महाराष्ट्र घडवुया – राज्यपाल सी. विद्यासागर राव

News Desk

एअरटेलतर्फे आयफोन एक्सएस आणि आयफोन एक्सएस मॅक्सच्या वेळेआधी डिलिव्हरीला सुरुवात 

News Desk

काँग्रेस प्रवक्ते महादेव शेलार यांची आत्महत्या

News Desk
राजकारण

मुख्यमंत्री इतके तटस्थ आणि स्थितप्रज्ञ कसे काय राहू शकतात?

swarit

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकीर्दीस चार वर्षे झाल्याबद्दल सर्वत्र ‘जश्न’ साजरा होत आहे. स्वागत आणि अभिनंदनाच्या अक्षता, फुलांचा वर्षाव त्यांच्यावर सुरू असतानाच बेळगावातील मराठी बांधवांवर कानडी दंडुक्यांचा वर्षाव झाला. अनेकांची डोकी फुटली, हाडे मोडली, अनेकांना फरफटत तुरुंगात डांबले. मराठी बांधवांचे काय चुकले? तर त्यांनी महाराष्ट्रात जाण्याचा पुकार करीत एक सायकल रॅली काढली व मायमराठीच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. मात्र कानडी पोलिसांनी त्यांची डोकी फोडली. पिढ्या बदलल्या तरी महाराष्ट्रात जाण्याची मागणी कायम आहे. या लोकभावनेस तुमच्या लोकशाहीत काही किंमत आहे की नाही? बेळगावात मराठी माणसांची डोकी फुटत असताना सत्तेचा चौकार मारलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इतके तटस्थ आणि स्थितप्रज्ञ कसे काय राहू शकतात?,असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे.

सामनाचे आजचे सामनाचे संपादकीय

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कानडी दंडुक्यांनी रक्तबंबाळ झालेल्या मराठी बांधवांच्या जखमांवर फुंकर घालण्यासाठी याआधीच जायला हवे होते. फडणवीससाहेब, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी तुमचा तो संपर्क व्हायचा तेव्हा होईल, त्यावेळी त्यांच्याशी जे काही बोलायचे ते बोलाल, पण तोपर्यंत लाठीमाराचा साधा धिक्कार तरी करा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकीर्दीस चार वर्षे झाल्याबद्दल सर्वत्र ‘जश्न’ साजरा होत आहे. स्वागत आणि अभिनंदनाच्या अक्षता, फुलांचा वर्षाव त्यांच्यावर सुरू असतानाच बेळगावातील मराठी बांधवांवर कानडी दंडुक्यांचा वर्षाव झाला. अनेकांची डोकी फुटली, हाडे मोडली, अनेकांना फरफटत तुरुंगात डांबले. मराठी बांधवांचे काय चुकले? तर त्यांनी महाराष्ट्रात जाण्याचा पुकार करीत एक सायकल रॅली काढली व मायमराठीच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. हा मोर्चा कश्मीरातील फुटीरतावाद्यांचा नव्हता व या मोर्चात देशद्रोही घोषणा नव्हत्या. कश्मीरात फडकवतात तसे इस्लामिक स्टेटचे झेंडे फडकवीत कुणी पोलिसांवर हल्ले करायला पुढे सरसावले नव्हते. बेळगावसह सीमाभागातील मराठी भावनांची कदर करा एवढेच सांगत हे तरुण रस्त्यावर उतरले होते. मात्र कानडी पोलिसांनी त्यांची डोकी फोडली. गेल्या 60-70 वर्षांत शेकडो वेळा येथील मराठी माणसाचे रक्त सांडले. अनेकांनी बलिदाने दिली तरीही कानडी विळखा झुगारून देण्याची सीमाभागातील मराठी माणसाची जिद्द आणि संघर्ष तसूभरही कमी झालेला नाही. पिढ्या बदलल्या तरी महाराष्ट्रात जाण्याची मागणी कायम आहे. या लोकभावनेस तुमच्या लोकशाहीत काही किंमत आहे की नाही? बेळगावात मराठी माणसांची डोकी फुटत असताना सत्तेचा चौकार मारलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इतके

तटस्थ आणि स्थितप्रज्ञ

कसे काय राहू शकतात? ज्यांच्यावर सीमाभागाच्या समन्वयाची, संपर्काची कायदेशीर जबाबदारी सोपवली आहे ते कॅबिनेटमंत्री चंद्रकांतदादा पाटील एव्हाना बेळगावात मराठीजनांच्या जखमांवर फुंकर घालताना दिसले असते तर आम्ही त्यांचे जाहीर कौतुक केले असते. पण मराठी प्रजा तिकडे रक्तबंबाळ होऊन झगडत असताना महाराष्ट्राचे मायबाप राज्यकर्ते त्यांच्या ‘चौकार’ समारोहात मशगूल झालेले दिसले. काय तर म्हणे, या लाठीमारासंबंधी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क करण्याचा, त्यांची भेट घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे तसे खुद्द चंद्रकांतदादांनीच सांगितले. थोडक्यात असा संपर्क झाला की मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कानडी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आणि तोंडी निषेधाचे दोन-चार बुडबुडे हवेत सोडणार. हा काय प्रकार आहे? कर्नाटक सरकारचा साधा निषेध, धिक्कार करण्यासाठी एवढा वेळ? बेळगावच्या रक्तबंबाळ जनतेचा आक्रोश जर महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांच्या कानाचे पडदे फाडणार नसेल तर सगळ्यात आधी तुमचाच धिक्कार करावा लागेल. शिवरायांच्या स्मारकास निघालेली बोट का बुडाली याचे उत्तर तुमच्या या मस्तवालपणात आहे. शिवरायांचे नाव घेता आणि ‘जय शिवाजी, जय भवानी’ म्हणणाऱ्यांची डोकी फुटत असताना थंडपणे बसून राहता? बेळगावसह

सीमाभागातील निवडणुकांत

महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव व्हावा म्हणून महाराष्ट्राचे भाजप मंत्री व मुंबईतील त्यांचे पुढारी बेळगावात ठाण मांडून बसले होते. तेथील मराठी माणसाला पूर्ण गाडूनच ते येथे परतले. तेव्हा त्यांच्याकडून न्यायाची व कारवाईची कोणती अपेक्षा करावी! सीमाप्रश्नाचे घोंगडे न्यायालयात वर्षानुवर्षे भिजत पडले आहे. राममंदिराच्या आधीपासूनच आमचा सीमाप्रश्न निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र मराठी बांधवांच्या भावनांना न्याय मिळेल अशा हालचाली महाराष्ट्राच्याच राज्यकर्त्यांकडून होताना दिसत नाहीत. बेळगावचा प्रश्न न्यायप्रवीष्ट असताना कर्नाटक सरकार तेथे बेकायदेशीर कृत्य करीत आहे. पोलिसी बळाचा वापर करून मराठी भाषा, संस्कृती ठोकरून लावत आहे. मराठी शाळा, मराठी फलक, भाषा बंद पाडली जात आहे आणि त्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना पोलीस रस्त्यावर तुडवत आहेत. हा कायदा आम्ही मानत नाही. हे कायद्याचे राज्य नाही. पालन करता येतील असेच निर्णय कोर्टाने द्यावेत, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले आहेच. बेळगावप्रश्नीही मग हीच भूमिका ठेवा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कानडी दंडुक्यांनी रक्तबंबाळ झालेल्या मराठी बांधवांच्या जखमांवर फुंकर घालण्यासाठी याआधीच जायला हवे होते. फडणवीससाहेब, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी तुमचा तो संपर्क व्हायचा तेव्हा होईल, त्यावेळी त्यांच्याशी जे काही बोलायचे ते बोलाल, पण तोपर्यंत लाठीमाराचा साधा धिक्कार तरी करा!

Related posts

रात्रीच्या अंधारात उंदरांनाही वाघाचे बळ येते!

swarit

महाआघाडीचा तिढा अखेर सुटला, काँग्रेस २४ तर राष्ट्रवादी २० जागांवर निवडणुका लढविणार

News Desk

अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर कोणालाही आनंद होण्याचे कारण नाही !

swarit