मुंबई | गेल्या आठ दिवसापासून ओला – उबर चालकांनी त्यांच्या काही मागण्या पूर्ण होण्यासाठी संप पुकारला होता. ओला उबरच्या राज्य राष्ट्रीय कामगार संघच्या मनमानीमुळे गेल्या सोमवारपासून महाराष्ट्रातील सर्व ओला उबर चालकांनी संप केले आहे. मात्र या ओला उबरच्या विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी जो संप पुकाराला त्यात एका चालकाने सहभाग न घेतल्याने बाकी कर्मचाऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
#WATCH: Ola driver thrashed by protesters for working during indefinite strike called by Ola & Uber cab drivers; Case registered. The protesters are demanding increased earnings& better work schedule. They have been on strike since Oct 22. #Mumbai (Note: Strong language) (26.10) pic.twitter.com/vm21THepjg
— ANI (@ANI) October 30, 2018
ज्या चालकाला मारहाण झाली त्याचे पाटील नाव असून तो पुण्याचा आहे. पुण्यातून मुंबईला भाडे घेऊन आल्याने त्याला ओला उबरच्या कर्मचाऱ्यांनी भांडुप येथे गाठुन त्याची मारहाण केली आहे. त्यांनतर त्याच्या मारहाणीचा बघून पुण्यातही त्याच्या मित्रांनी त्याची मारहाण केली. या प्रकरणी पाटीलने पोलीसत तक्रार केली .पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
सोमवारी ८ तासांहून अधिक वेळ झालेल्या बैठकीत ऍप बेस्ट टॅक्सी चालक मालकांच्या सुमारे ८० टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या आहे. परंतु अॅप बेस्ड टॅक्सी कर्मचाऱ्यांच्या अन्य प्रश्नांबाबत परिवहन आयुक्तांच्या बैठकीनंतर संपाबाबत भूमिका घेण्येयात येणार आहे. यामुळे मंगळवारी सकाळी अॅप बेस्ड टॅक्सी प्रवाशांसाठी ‘ऑफलाइन’ राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.