HW News Marathi
मुंबई

उद्धव ठाकरेंच्या हस्ते नॅशनल मोबाईल मेडिकल युनिटचे लोकार्पण

मुंबई | नॅशनल मोबाईल मेडिकल युनिट या कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा आज वांद्रे येथील रंगशारदा नाट्यमंदिरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत निवडक महानगरांसाठी व काही शहरी भागातील झोपडपट्टी भागात व दुर्गम आणि अतिदुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी आरोग्याच्या सेवांपासून लोक वंचित राहतात, अशा गरजू लोकांना आरोग्याच्या सेवा देण्यासाठी हा प्रकल्प केंद्र सरकारकडून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबवण्यात येणार आहे.

वैद्यकीय सुविधांचा अभाव असणाऱ्या ठिकाणी महिन्यातून एक किंवा दोन वेळा मोबाईल यूनिट भेट देणार असून तेथील गरजू व गरीब लोकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आहे. प्रत्येक मोबाईल युनिटमध्ये १ डॉक्टर, एक नर्स, १ लॅब टेक्निशिअन, १ वाहनचालक, १ फार्मासिस्ट असे कर्मचारी असणार आहेत. दर महिन्यास भेट दिलेली यादी व त्यानुसार तयार केलेला अहवाल राज्य आरोग्य सोसायटीस पाठविला जाणार आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वचन म्हणून दिलेल्या गोष्टी पूर्ण झाल्याचा आनंद असल्याचे म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेट्रोच्या कामासाठी पुन्हा एकदा झाडांचा बळी

swarit

वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक याचा सन्मान

swarit

मुंबईतही रिपाइंला भाजपकडून सापत्न वागणूक

News Desk