मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांकडून राम मंदिर निर्माणाच्या विषयाचे मोठ्याप्रमाणात राजकारण केले जात आहे. प्रत्येकजण राम मंदिर निर्माण संबंधी मोठ-मोठी विधाने करुन चर्चेत राहत आहेत. शिवसेनेच्या प्रयत्नाशिवाय राम मंदिराची उभारणी होणार नाही, असे विधान राम जन्मभूमी न्यासच्या प्रमुखांनी केले आहे .
Chief of Ram Janmabhoomi Nyas came and met Uddhav ji, he was of the belief that its only Shiv Sena's effort and nothing else which can help build the Ram Temple . Uddhav ji will go to Ayodhya soon: Sanjay Raut,Shiv Sena pic.twitter.com/SzUkSCYmTp
— ANI (@ANI) October 4, 2018
अयोध्येतील श्रीराम मंदिर न्यायासाचे अध्यक्ष जनमेयशरणजी महाराज यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तसेच त्यांना अयोध्येला येण्याचे आमंत्रण दिले असून उद्धव ठाकरे यांनी अयोध्याला जाण्याच्या आमंत्रण स्वीकारले आहे. ठाकरे आपल्या शिवसैनिकांसह दसऱ्यानंतर राम मंदिराच्या उभारणीसाठी अयोध्याला भेट देणार आहेत. अयोध्याला जाण्याची तारीख दसऱ्याच्या मेळाव्यात कळेल, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपले विधान व्यक्त केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.