HW News Marathi
मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘परळ टर्मिनस’चे लोकार्पण

मुंबई | कॉर्पोरेट हबसाठी ओळखले जाणाऱ्या परळच्या रेल्वे स्थानकाचे रूपांतर रविवारी (३ मार्च) अखेर ‘परळ टर्मिनस’मध्ये करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते डोंबिवली या १५ डब्यांच्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रविवारी परळ टर्मिनसचे लोकार्पण केले आहे. परळ टर्मिनस हे पश्चिम रेल्वे मार्गाला जोडत असल्याने प्रवाशांना येथून प्रवास करणे सोपे होणार आहे.

नवीन रेल्वे रूळ टाकून कल्याणकडे जाणारी नवीन मार्गिका तयार करण्यात असून फलाट क्रमांक २ अ ही टर्मिनस मार्गिका आणि फलाट क्रमांक ३ चे रुंदीकरण करण्यात आले आहे. १२ मीटर रुंदीचा पूर्व-पश्चिम जोडणारा पादचारी पूल, सरकते जिने इ. सुविधा उपलब्ध आहेत.

पुणे-नागपूर हमसफर एक्स्प्रेसचे, मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, सुरत-मुजफ्फरपूर एक्स्प्रेस, वलसाड-पुरी सुपरफास्ट एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल-सुरत फ्लाइंग राणी एक्स्प्रेस, लोणावळा, इगतपुरी स्थानकांचा पुनर्र्विकास, नेरळ-माथेरान गाडीचे विस्टाडोम डबे यांचेही लोकार्पण करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वच्छतागृहातच कैदी आत्महत्या का करतात 

News Desk

व्यापाऱ्यांना फटाका विक्री परवान्यासाठी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदत

News Desk

तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

News Desk