HW News Marathi
महाराष्ट्र

‘स्वाइन फ्लू’ची दहशत, जागतिक आरोग्य संघटनेसह सर्वच देशांनी कंबर कसणे आवश्यक !

मुंबई । सीमेवरील घडामोडींमुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत युद्धज्वर निर्माण झालेला असतानाच स्वाइन फ्लूच्या आजाराने पुन्हा उचल खाल्ली असून देशभरात सुमारे 400 लोकांचे बळी घेतले आहेत.मृतांची ही संख्या जानेवारी आणि फेब्रुवारी या दोनच महिन्यांतील आहे. अत्यंत संसर्गजन्य असलेल्या या भयंकर साथरोगाने महाराष्ट्रात 35 जण मृत्युमुखी पडले आहेत. याशिवाय राज्याच्या कानाकोपऱ्यात स्वाइन फ्लूचे 518 रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. 17 रुग्णांना तर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. एकट्या नागपूर शहरात स्वाइन फ्लूचे 157 रुग्ण आढळले आहेत. नाशिकमध्ये 84, पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात 82, मुंबई-ठाण्यात 117, संभाजीनगरात 19, कोल्हापुरात 17 रुग्ण दाखल झाल्याची नोंद आहे. स्वाइन फ्लूच्या राक्षसी विषाणूंनी देशातील सर्वच राज्यांवर हल्ला चढवला आहे. महायुद्धापेक्षाही अधिक बळी घेणाऱ्या या विषाणूंना कायमचे हद्दपार करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेसह सर्वच देशांनी आणि संशोधकांनी कंबर कसणे आता आवश्यक झाले आहे, अशा शब्दात सामनाच्या संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

सीमेवरील घडामोडींमुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत युद्धज्वर निर्माण झालेला असतानाच स्वाइन फ्लूच्या आजाराने पुन्हा उचल खाल्ली असून देशभरात सुमारे 400 लोकांचे बळी घेतले आहेत. गेल्या दहा वर्षांत एकट्या हिंदुस्थानात या संसर्गाने हजारो बळी घेतले आहेत. जगभरातील स्वाइन फ्लूच्या बळींचा आजवरचा आकडा लाखांहून अधिक आहे. महायुद्धापेक्षाही अधिक बळी घेणाऱ्या या विषाणूंना कायमचे हद्दपार करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेसह सर्वच देशांनी आणि वैज्ञानिकांनी कंबर कसणे आता आवश्यक झाले आहे.

सीमेवरील घडामोडींमुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत युद्धज्वर निर्माण झालेला असतानाच स्वाइन फ्लूच्या आजाराने पुन्हा उचल खाल्ली असून देशभरात सुमारे 400 लोकांचे बळी घेतले आहेत. मृतांची ही संख्या जानेवारी आणि फेब्रुवारी या दोनच महिन्यांतील आहे. अत्यंत संसर्गजन्य असलेल्या या भयंकर साथरोगाने महाराष्ट्रात 35 जण मृत्युमुखी पडले आहेत. याशिवाय राज्याच्या कानाकोपऱ्यात स्वाइन फ्लूचे 518 रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. 17 रुग्णांना तर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. एकीकडे राज्यातील शासकीय रुग्णालये स्वाइन फ्लूचे निदान झालेल्या रुग्णांना वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे राज्यातील आरोग्य यंत्रणा या रोगाचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी शर्थींचे प्रयत्न करत आहे. मात्र स्वाइन फ्लूचे विषाणूच इतके भयंकर आहेत आणि इतक्या वेगाने त्यांचा प्रसार होतो की, सरकारी यंत्रणा कितीही सक्षम ठेवली तरी या जीवघेण्या रोगाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होत नाही. 2009 सालापासून उद्भवलेल्या स्वाइन फ्लूच्या

संकटामध्ये दरवर्षी वाढच

होत आहे. यावर्षी हिवाळ्य़ाचे चार महिने संपल्यानंतरही थंडीचा मुक्काम वाढला. उलट हिवाळा संपताना थंडीचा जोर अधिक वाढला. जानेवारी महिन्यापासून ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत देशभरात थंडीची लाटच पसरली. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या विषाणूंसाठी दीर्घकाळ पोषक वातावरण निर्माण झाले. वास्तविक उन्हाळा सुरू झाल्यानंतर कडक उन्हाचा तडाखा बसू लागला की, स्वाइन फ्लूचे विषाणू गायब होतात, असा या रोगाच्या उत्पत्तीपासूनचा अनुभव आहे. मात्र देशाच्या काही भागांत अजूनही रात्री आणि सकाळच्या वेळेस थंडी कायम असल्यामुळे यावर्षी स्वाइन फ्लूचा कहर अधिकच वाढला आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत गतवर्षी महाराष्ट्रात स्वाइन फ्लूने 4 जणांचा बळी घेतला होता आणि 15 रुग्णांची नोंद झाली होती. हाच आकडा यावर्षी अनेक पटींनी वाढून 35 बळी आणि 518 रुग्ण असा झाला. यंदा उद्रेक किती भयंकर आहे याची कल्पना या आकडय़ांवरून येते. एरवी पुणे आणि परिसरात सर्वाधिक असणारा स्वाइन फ्लूचा फैलाव

यावर्षी मात्र विदर्भात

मोठय़ा प्रमाणावर झाला. एकट्या नागपूर शहरात स्वाइन फ्लूचे 157 रुग्ण आढळले आहेत. नाशिकमध्ये 84, पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात 82, मुंबई-ठाण्यात 117, संभाजीनगरात 19, कोल्हापुरात 17 रुग्ण दाखल झाल्याची नोंद आहे. स्वाइन फ्लूच्या राक्षसी विषाणूंनी देशातील सर्वच राज्यांवर हल्ला चढवला आहे. राजस्थानात तर स्वाइन फ्लूच्या साथीने हाहाकार उडवला आहे. राजस्थानात देशातील सर्वाधिक 3600 हून अधिक रुग्णांना स्वाइन फ्लूने ग्रासले आहे आणि मागील दोन महिन्यांत तिथे 150 लोकांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 2000 रुग्ण आणि 80 जणांचा बळी, पंजाबात 450 रुग्ण आणि 40 बळी अशी ही आकडेवारी आहे. इतर राज्यांतही कमी-अधिक प्रमाणात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव आहेच. स्वाइन फ्लूशी दोन हात करण्यासाठी एच-1, एन-1 ची प्रतिबंधात्मक लस आता उपलब्ध असली तरी 2009 पासून साऱ्या जगावर हल्ला चढविणाऱ्या स्वाइन फ्लूची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या दहा वर्षांत एकट्या हिंदुस्थानात या संसर्गाने हजारो बळी घेतले आहेत. जगभरातील स्वाइन फ्लूच्या बळींचा आजवरचा आकडा लाखांहून अधिक आहे. महायुद्धापेक्षाही अधिक बळी घेणाऱ्या या विषाणूंना कायमचे हद्दपार करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेसह सर्वच देशांनी आणि संशोधकांनी कंबर कसणे आता आवश्यक झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात एकही वर्तमानपत्र प्रसिद्ध होणार नाही

swarit

बुलडाणा जिल्ह्यात पाच रूग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

News Desk

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी, कोरोना बाधितांची रुग्ण संख्या शंभरीच्या खाली!

News Desk