HW News Marathi
मुंबई

चेंबूर येथील आगीला दुतर्फा लावलेल्या गाड्या जबाबदार

मुंबई | चेंबूर टिळक नगर येथील सरगम सोसायटीत गुरुवारी लागलेल्या आगीला या सोसायटीच्या रस्त्यावर दुतर्फा लावलेल्या असंख्य गाड्या जबाबदार आहेत. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या उंच शिड्यांचा वापर करणे त्यांना शक्य झाले नाही. कारण त्यांचे फायर इंजिन या लेनमध्ये प्रवेशच करू शकले नाहीत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गाड्या लावल्या होत्या. येथील स्थानिकांनी त्या वाहनांच्या मालकांना बाहेर बोलवून या गाड्या रस्त्यावरुन काढायला सांगितल्या, अशी माहिती तिथे राहणारे स्थानिक रहिवासी अशोक सातार्डेकर यांनी दिली.

“सरगम सोसायटीतील १५ मजली इमारतीचा पुनर्विकास होण्यापूर्वी ती ३६ गाळ्यांची ची दोन मजली इमारत होती. आता येथे १०० पेक्षा जास्त फ्लॅट्स आहेत. टिळक नगरमधील प्रत्येक इमारतीमध्ये अशीच परिस्थिती आहे. येथे पार्किंगसाठी जागा नसल्याने लोक रस्त्याच्या दुतर्फा गाड्या लावतात. अगदी कचरा गोळा करणाऱ्या वाहनाला देखील येथे प्रवेश करणे कठीण होते”, असेही सातार्डेकर म्हणाले.

या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेले रहिवासी श्रीनिवास जोशी (८६) हे राजवाडी हॉस्पिटलमध्ये दाखल असून त्यांची प्रकृती प्रचंड गंभीर आहे. अग्निशमन दलाचे जवान चगन सिंग (२८) जखमी झाल्याने त्यांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

समोरच्या फ्लॅटमध्ये आग लागली तेव्हा सरला तिच्या पती आणि सासूसह घरातच होती. तिचे पती सुखरूपपणे तेथून बाहेर पडले. परंतु सरला तिच्या सासूसह सुरक्षित ठिकाण शोधण्याच्या प्रयत्नात बाहेर पडली आणि हरवली. “आम्ही त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होऊ शकला नाही. आम्ही त्यांची खूप वाट पहिली”, अशी माहिती भरत (सरलाचा भाऊ) यांनी दिली. परंतु, दोन तासांच्या शोधानंतर या दोन स्त्रियांचा मृतदेह सापडला. “आम्ही बचाव करायला आलो होतो. परंतु, आम्हाला काहीही करता आले नाही. खालच्या मजल्यावरील लोक सुरक्षित खाली पोहोचले होते. वरच्या मजल्यावरील लोक मात्र अडकले होते”, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली.

राजवाडी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिक्षक विद्या ठाकूर म्हणाल्या, “रुग्णालयात आणले गेलेले दोघे जण जळलेल्या अवस्थेत होते तर तीन जणांना धुरामुळे श्वासोच्छवासास त्रास होत होता. परंतु, शवविच्छेदनानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण नेमके स्पष्ट होईल.” आग लागल्याच्या तीन तासानंतर बरेच लोक इमारतीच्या बाहेर वाट पाहत होते आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आपल्या न सापडलेल्या नातेवाईकांबाबत माहिती देत होते. रहिवाशांकडून काहीजण घरातच अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घरांचे दरवाजे देखील तोडले. यामुळे दोन जणांना वाचविण्यास मदत झाली. मात्र हे दोघेही बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

येथील स्थानिक ‘महाराष्ट्र ऐक्यवर्धन गणपती मंडळा’च्या तरुण सदस्यांनी या बचाव मोहिमेत मदत केली. “आमच्या डोळ्यांदेखत एकापाठोपाठ एक असे एकूण तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले. उंचीवर असलेल्या वाऱ्याच्या वेगामुळे शेजारील फ्लॅट्सना देखील या आगीची झळ बसली”, असे या मंडळाचे सदस्य विशाल बिलाय म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार

News Desk

पावसामुळे महाविद्यालयीन परीक्षा पुढे ढकलल्या; विनोद तावडेंची माहिती

swarit

मनसेच्या नगरसेवकांची हवाल्याच्या पैशातून खरेदी

News Desk