मुंबई | सायन-पनवेल महामार्गावर नादुरूस्थ अवस्थेत असलेला पादचारी पूर हटविताना क्रेन उलटून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या पादचारी पुलाचं काम क्रेनच्या मदतीने सुरू होते. पुलाचे वजन अधिक असल्यानं क्रेनची क्षमता कमी पडली आणि दुर्घटना घडली. मानखुर्द जंक्शनपासून वाशीपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.
Thane: Part of a foot overbridge collapsed near Vashi Police Naka earlier this evening. No casualties have been reported yet. More details awaited. #Maharashtra pic.twitter.com/HEXUj8qyVk
— ANI (@ANI) October 7, 2018
वाशी खाडीजवळ असलेल्या जकात नाक्यासमोर हा पादचारी पूल हटविण्याचे काम आज (७ ऑक्टोबर)पासून सुरू करण्यात येणार होते. सायंकाळी चार वाजताच्या सुमारास हा पूल हटविण्यासाठी येथील वाहतूक बंद करण्यात आली होती. क्रेनच्या साहाय्याने हा पादचारी पूल हटवण्यास सुरुवात केली. परंतु पुलाचे वजन जास्त झाल्यामुळे क्रेन पुलासह रस्त्यावर उटली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.