HW News Marathi
मुंबई

पतंगराव कदम यांचा अल्पपरिचय

पतंगराव कदम यांचा जन्म 1945 रोजी सांगली जिल्ह्यातील सोंसल या गावी झाला. गावात शाळा नसल्या कारणाने पतंगरावांना 4 ते 5 किमी चालत जाऊन प्राथमिक शिक्षण घ्यावं लागत असे. पुढे पलूस तालुक्यातील कुंडल गावातून ते दहावी उत्तीर्ण झाले.

दहावीनंतर त्यांनी साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. शिक्षण क्षेत्रातील सेवेची बिजं याच संस्थेत त्यांच्यामध्ये रुजली.

1961 साली ते पुण्यात आले आणि एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स करुन, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यावेळी पुणे विद्यापीठातून त्यांनी कायद्यात बॅचलर डिग्री मिळवली आणि पुढे पुणे विद्यापीठातून मास्टरचेही शिक्षण पूर्ण केले.

1964 साली वयाच्या 20 व्या वर्षी पुण्यात भारती विद्यापीठाची स्थापना केली.

राजकीय कारकीर्द

1985 ते 2014 अशा कालावधीतील सात विधानसभा निवडणुकीत पतंगराव कदम भिलवडी-वांगी आणि पलूस विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले. सलग सातवेळा विजयी होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.

1968 साली ते एसटी महामंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त झाले आणि तेव्हापासून गेली 40 हून अधिक वर्षे ते महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात कार्यरत राहिले. पश्चिम महाराष्ट्रातील ‘लोकनेता’ म्हणूनही त्यांचा गौरव झाला.

जून 1991 ते मे 1992 – शिक्षण राज्यमंत्री

मे 1992 ते 1995 – शिक्षणमंत्री (स्वतंत्र खाते)

ऑक्टोबर 1999 ते ऑक्टोबर 2004 – उद्योग, व्यापार, वाणिज्य आणि संसदीय कामकाज खात्यांचे कॅबिनेट मंत्री

नोव्हेंबर 2004 पासून पुढे – पुनर्वसन आणि मदतकार्ये या खात्यांचे मंत्री

प्रभारी अध्यक्ष – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

डिसेंबर 2008 पासून – कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन – महसूल, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन आणि शालेय शिक्षण

मार्च 2009 पासून – कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन महसूल खाते

नोव्हेंबर 2009 पासून पुढे – कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन – वनविभाग

19 नोव्हेंबर 2010 ते 2014 – कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य – वनविभाग, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन सावंत हत्येप्रकरणी 7 जणांना अटक  

News Desk

ऑटो रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ नाही, सर्वसामान्यांना दिलासा

News Desk

शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी गेलेल्या स्पीड बोटच्या अपघात १ जण बुडाल्याची भीती

News Desk