HW News Marathi
मुंबई

पोद्दार रुग्णालयातील गैरसोय झालेल्या रुग्णांची आदित्य ठाकरेंनी मागितली माफी

मुंबई | कोरोनाचा विळखा हा महाराष्ट्रात तर वाढत आहेच पण मुंबईत कोरोनाची अनेक हॉटस्पॉट केंद्र बनण्यास सुरुलात झाली आहे. मुंबईच्या वरळी कोळीवाड्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आणि पोलीसांनी तात्काळ वरळी कोळीवाडा सील केला. वरळीच्या पोदार रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. त्याचा एक व्हिडिओ वायरल झाला होता. त्यात रुग्णांचे होणारे हाल दाखवण्यात आले होते. दरम्यान, वरळीचे आमदार व राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या साऱ्याची गंभीर दखल घेतली असून संबंधितांवर कारवाई केली आहे. तसेच, गैरसोयीबद्दल त्यांनी रुग्णांची माफीही मागितली आहे.

वरळी, प्रभादेवी या भागात कोरोनाचे अनेक रुग्ण आढळल्याने त्यांना उपचारासाठी वरळीच्या पोद्दार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू, त्यांची प्रचंड गैरसोय झाल्याचे समोर आले. वायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रुग्णालयातील बाथरूम, टॉयलेटची दुरावस्था दाखवण्यात आली होती. जेवण व पिण्याच्या पाण्याचीदेखील चांगली सोय नसल्याची तक्रार रुग्णांनी केली होती. त्यामुळे आमदार आदित्य ठाकरे यांनी ज्यांच्यामुळे ही गैरसोय झाली त्यांच्यावर कारवाई केली असल्याचे ट्विटरद्वारे सांगितले आहे. तसेच, त्यांना दुसऱ्याजागी उपचारासाठी नेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात चार वर्षीच्या बालिकेवर बलात्कार

News Desk

ईदच्या दिवशी अचानक झालेल्या अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा

News Desk

आज पश्चिम-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

News Desk