HW News Marathi
मुंबई

पुण्यात चार वर्षीच्या बालिकेवर बलात्कार

पुणे- चाकणमध्ये चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघडकील आली आहे. आईस्क्रीमचे आमिष दाखवून एका तरूणाने हा घृणास्पद प्रकार केला आहे. पीडित चिमुरडी घरासमोरील अंगणात तिच्या भावासोबत खेळत होती.

आरोपी मन्सूरने तिला आईस्क्रीमचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी एका महिलेने चाकण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलीचे आई-वडील आणि मगबूल पप्पूलाल इनामदार यांचे कुटुंब एकमेकांच्या समोर राहातात. पीडिता भावासोबत अंगणात खेळत होती. तिची आई घरकाम करत होती. अचानक तिला मुलगी रडण्याचा आवाज आल्याने या घराबाहेर धावत गेली. मुलीला विचारले असता तिने सांगितले की, मन्सूरने आईस्क्रीम देतो असे सांगून घरात नेले. गालावर ओरबाडल्याचे तिने सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी भाषा दिनातून शिवसेनेला वगळले, रावतेची मात्र हजेरी

News Desk

म्हाडाच्या घरांची १६ डिसेंबरला लॉटरी सोडत

swarit

दाऊदच्या कोट्यवधी संपत्ती विकत घेण्यासाठी 12 जण इच्छुक

News Desk