HW Marathi
मुंबई राजकारण

क्वॉरन्टाईनचा शिक्का हातावर असूनही पळ काढणाऱ्यावर होणार कारवाई – गृहमंत्री

मुंबई  | कोरोनाचा संसर्ग अधिक होऊ नये यासाठी क्वॉरन्टाईन केल्यावर त्या रुग्णांच्या हातावर निळ्या शाईचा स्टॅम्प मारण्यात येत आहे आणि त्यांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. परंतु, अशा रुग्णांच्या पळण्याच्या घटना अधिक होत आहेत. याच पार्श्वभूमिवर पळ काढणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. देशमुख यांनी यासंदर्भात ट्वीट करुन अशा लोकांवर पोलिसांमार्फत कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही सद्यस्थितीला ४९ आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणखी होऊ नये, यासाठी लागण झालेल्यांना क्वॉरन्टाईन करण्यात येत आहे. त्याचा पुरावा म्हणून हातावर शिक्काही मारण्यात येतो.  पण हातावर क्वॉरन्टाईनचा शिक्का असलेले काही जण सार्वजनिक वाहनांतून तसेच शहरांमध्ये फिरताना आढळले होते. यामुळे इतर लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गृहमंत्र्यांनी अशा लोकांवर साथीचे रोग अधिनियमअन्वये कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.

दरम्यान, परदेशातून आलेले गुजरातमधील ४ जण काल (१८ मार्च) गरीबरथ या ट्रेनमधून प्रवास करत होते. सहप्रवाशांनी त्यांच्या हातावरील शिक्का पाहिल्यानंतर टीसीला याबाबत सूचना दिली आणि त्यांना पालघर रेल्वे स्थानकात उतरवण्यात आले.  तरी अजूनही कोणी अशा आदेशांचे उल्लंघन करु नये असे शासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. तरी लवकरात लवकर कोरोनाच्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी संपुर्ण देश युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

Related posts

लालु प्रसाद यादव यांच्या अडचणी कमी होण्याची शक्यता नाही, आणखी एका प्रकरणात दोषी

News Desk

राज्यातील विधानसभेतील २० प्रमुख चुरशीच्या लढती

News Desk

आज दिवसभर अशाच बातम्या येतील !

rasika shinde