HW News Marathi
मुंबई

राम कदम विरोधात हायकोर्टात याचिका दाखल

मुंबई | दही हंडीच्या कार्यक्रमात महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार राम कदम यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामुळे राम कदमांच्या अडचणीत वाढ झाली असून महिलांबाबत असभ्य विधान करून अपमान केल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी याचिकेत म्हटले आहे. ही याचिका राष्ट्रवादीच्या पुणे शहर महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दाखल केली आहे. २१ सप्टेंबरला या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

नेमके काय होते ते वादग्रस्त वक्तव्य

“तुम्हाला एखादा मुलगी पसंत असेल पण तिने नकार दिला तर तुमच्या आई-वडिलांना माझ्याकडे घेऊन या, मी तुम्हाला ती मुलगी पळवून देण्यास मदत करेन”, असे ते वादग्रस्त वक्तव्य राम कदम यांनी दहीकाला उत्सवात केले होते. कोणत्याही व्यक्तीने विशेषतः लोकप्रतिनिधीने हे असे विधान ही अत्यंत शरमेची बाब आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी सर्वत्र उमटत होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाचे काय झाले? न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

News Desk

प्रकाश आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षतेचे धडे आम्हाला देऊ नयेत | पवार

Gauri Tilekar

वसई समुद्रात ‘मॉर्निंग स्टार’ बोट बुडाली, ६ जण बचावले

News Desk