HW News Marathi
राजकारण

माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे | राम कदम

मुंबई |या वर्षीच्या दहीकाला उत्सवात एखादे लक्षवेधी वक्तव्य करून तरुणांची मने जिंकण्याच्या बालिश प्रयत्नात भाजप आमदार राम कदम यांनी महिलांबद्दल अत्यंत वादग्रस्त असे विधान केले आणि स्वतःवरच वाद ओढवून घेतला. यानंतर सर्वच स्तरावरून राम कदम यांच्यावर टीकेची झोड उठली होती. अनेक राजकीय पक्षांनी, तसेच महिलांनी त्यांच्या निषेधार्थ तीव्र आंदोलने केली. त्यामुळे आता अखेर राम कदम यांनी आपल्या ट्वीटर अकाऊन्ट वरून जाहीर माफी मागत दिलीगिरी व्यक्त केली आहे.

“माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली . झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुनःश्च माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे.” असे ट्वीट करून राम कदम यांनी माफी मागितली आहे.

परंतु या माफीत त्यांनी त्यांचे वक्तव्य चुकीचे होते हे अजूनही मान्य केलेले नाही. तसेच ही माफी मनापासून नसून केवळ पेटला वाद शामविण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.

नेमके काय होते ते वादग्रस्त वक्तव्य

“तुम्हाला एखादा मुलगी पसंत असेल पण तिने नकार दिला तर तुमच्या आई-वडिलांना माझ्याकडे घेऊन या, मी तुम्हाला ती मुलगी पळवून देण्यास मदत करेन” , असे ते वादग्रस्त वक्तव्य राम कदम यांनी दहीकाला उत्सवात केले होते. कोणत्याही व्यक्तीने विशेषतः लोकप्रतिनिधीने हे असे विधान ही अत्यंत शरमेची बाब आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी सर्वत्र उमटत होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रयागराजमध्ये सर्व भाविक अक्षयवट आणि सरस्वती स्तंभाचे दर्शन करू शकणार !

News Desk

जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट, राष्ट्रपतींनी दिली मंजुरी

News Desk

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांचा प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल

Aprna