HW News Marathi
मुंबई

गुढीवाडव्याच्या मुर्हूतावर राज्यभरात प्लास्टिक बंदी

मुंबई | गुढीवाडव्याच्या शुभ मुर्हूतावर राज्यभरात प्लास्टिकवर बंदी घालण्यात येणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्लास्टिक बंदीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.

पहिल्या टप्प्यात प्लास्टिकच्या पिशव्या, ताटे, चमचे आणि टोप्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात सहा महिन्यानंतर पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटलीवर बंदी घालण्यात येणार आहेत. प्लास्टिकच्या बाटलीला पर्याय म्हणून नाशवंत बाटल्या असा पर्याय ठेवला जाणार आहे.

प्लास्टिकच्या पिशव्या इतर उत्पादनांच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. पावसाळ्यात प्लास्टिकमुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होतात. हे प्लास्टिक जनावरांच्या पोटात गेल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. प्लास्टिकच्या विक्री आणि वापऱ्यावर दोघांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून ३७० झाडांचे वृक्षारोपण

News Desk

धारावीतील निर्माणाधीन इमारतीचा भाग कोसळून १ मृत्यू, ३ जण जखमी

News Desk

कुर्ल्याचा हरियाणा वाला लेन परिसर अंधारात

swarit