HW News Marathi
मुंबई

रेल्वेतल्या स्टंटबाजीसाठी पोलिसांची बैठक

मुंबई | हार्बर मार्गावरील मानखुर्द ते चुनाभट्टी रेल्वे स्थानक दरम्यान दिवसेंदिवस स्टंटबाजीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ‘या स्टंट बाजीला आपण एकत्र येऊन आळा घातला पाहिजे,’ असे रेल्वे प्रवाशी महासंघाचे अध्यक्ष अभिजीत धुरत यांनी सांगितले. हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवाशाच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने करावयाची उपाय योजनाकरीता वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने रेल्वे सुरक्षा समितीची सतर्क सभा चेंबूरच्या रेल्वे पोलीस चौकीत मंगळवार घेण्यात आली होती त्या प्रसंगी ते बोलत होते.

मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, कुर्ला, चुनाभट्टी रेल्वे स्थानकात स्टंट बाजी, कुर्ला या रेल्वे स्थानकातील स्टंट बाजी मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच रेल्वे डब्यातील महिलांवर होणारे अत्याचार रोखले पाहिजे.अशा सभा एकुण 13 स्थानकात लोहमार्ग पोलिसांच्या वतीने सतर्क सभा घेण्यात येणार आहे. असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित बारटक्के यांनी यावेळी सांगितले. यावेळी पोलीस उप निरीक्षक सदाशिव खोत, चेंबूर रेल्वे स्टेशन मास्टर हरी मीना, मानखुर्द आरपीएएफचे प्रभारी निरीक्षक चंदन वर्मा, तिकीट तपासणीस इ.जि. मुदलीयर, पोलीस हवालदार मंगेश साळवी, पोलीस प्रवासी मित्र बूट पॉलिश करणारे कर्मचारी, आणि पोलीस कर्मचारी आदी मिळून 33 सदस्य या बैठकीस हजर होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रपतींचा उपयोग शून्य – राज ठाकरेंचं वादग्रस्त वक्तव्यं

News Desk

परळ आणि एलफिन्स्टन स्थानकांना जोडणार नवीन पुल

swarit

खरेदीविक्रीचा बाजार कुणी मांडलाय

News Desk