HW News Marathi
मुंबई

अनेक महिलांचा विनयभंग करणारा विकृत पोलिसांच्या ताब्यात

मुंबई |महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता वारंवार होणाऱ्या गुन्हांमुळे ऐरणीवर आला आहे. रात्री अपरात्री महिला असुरक्षित होत्याच पण भरदिवसाही सुरक्षित नसल्याचे प्राकर वारंवार समोर येत आहेत. माटुंगा रेल्वेस्थावकावरील पुलावर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुलीची छेडछाड करतानाचा अश्लील व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पुलावरुन ये-जा करणाऱ्या महिलांना धक्का मारणे, त्यांची छेडछाड करतानाचा त्या विकृताचा व्हिडीओ कॅमेराबद्द झाला आहे. ही घटना २६ जानेवारीला माटुंगा स्टेशनवर दुपारी घडली. तरुणी पुलावरुन जात असताना विकृत तिच्या मागून आला आणि तिची छेडछाड करुन तिथून पळून गेला. आपल्यासोबत नेमके काय घडले हे तरुणीला समजलेच नाही. हतबल झालेली ती मुलगी तिथून निघून गेली. दरम्यान राजीजूर खान या विकृताला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी वारंवार अशा छेडछेडाने महिलांमध्ये भीतीचे वातवरण पसरले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भेंडीबाजार इमारत कोसळून आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू, 15 जण जखमी

News Desk

संतप्त मुंबईकरांनी भाजप मेळाव्याला जाणा-या बस रोखल्या

News Desk

मोटरमनच्या प्रसंगावधानानं वाचला जीव

News Desk