HW News Marathi
मुंबई

मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकात गर्दीच्या वेळी पोलीस तैनात

डोंबिवली | मध्य रेल्वेच्या कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान काल (२२ जुलै) सविता नाईक यांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. या अपघाताची दखल घेत मध्य रेल्वेच्या पोलिसांनी सतर्कता म्हणून डोंबिवलीच्या फलाट क्र. ३ आणि ५ वर आरपीएफ पोलीस कार्यरत रहणार आहे.

मध्य रेल्वेच्या महिला डब्यात महिलासमोर पोलिसांनी उभे राहावे, डब्यात चढताना महिला पुढे सरकायाल सांगावे. यासाठी गेल्या काही दिवपांपासून महिलांच्या येथे आरपीएफ पोलिसांनी तैनात करण्याची मागणी महिला करत होते. महिला प्रवासी खिडकीजवळ जाऊन महिलांना पुढे सरकण्याचे आवाहन करत होत्या. गर्दीच्या वेळी पोलीस फलाटावर ठेवण्याचा प्रयत्न ठेवू असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आरपीएफचे पोलीस कल्याण, ठाकुर्ली, दिवा, मुंब्रा, बदलापूर, अंबरनाथ, आसनगाव, टिटवाळा, उल्हासनगर या स्थानकात कार्यरत असावेत अशी मागणी महिला प्रवाशांनी केली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उंदरासाठी १३० कोटीचं घर 

News Desk

रस्त्याच्या दुरावस्थेप्रकरणी पालिकेकडून कंत्राटदारांवर करवाई

News Desk

निळ्या रंगाच्या कुत्र्याचे कुतूहल पोकळ

News Desk