HW News Marathi
मुंबई राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीच्या भावाचा शिवसेनेत गटात प्रवेश

मुंबई | अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी यांचा भाऊ प्रदीप गवळी (Pradeep Gawali) आणि माजी नगरसेविका वंदना गवळी या दोघांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या दोघांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर शिंदे गटात मोठ्या संख्येने ठाकरे गटातील नेते, आमदार, खासदार यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी आतापर्यंत प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी प्रदीप गवळी आणि वंदना गवळी यांनी शिवसेनेते प्रवेश केल्यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “मुंबईतील भायखळा परिसरातील माजी नगरसेविका वंदना गवळी आणि प्रदीप गवळी यांच्यासह अखिल भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.”

प्रदीप गवळी आणि वंदना गवळी यांच्या प्रवेशावर मुख्यमंत्री म्हणाले, “या भागातील प्रश्न सोडवण्याचे काम तुमच्या मार्गदर्शनाखील तिथे केले जाईल हा विश्वास मी आपल्याला देऊ इच्छितो. गेल्या सहा-सात महिन्यांमध्ये बाळासाहेबांच्या विचारांचा सरकार आपण स्थापन केल्यानंतर राज्यातील अगदी जिल्हा जिल्ह्यातून तालुका तालुक्यातून शहरातून अनेक कार्यकर्ते विविध पक्षातील पदाधिकारी शिवसेनेते सामील झाले आहेत.”

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्रपती शिवाजी महाराज मंडई ऐरोलीत स्थलांतरित करणार नाही !

Gauri Tilekar

कर्नाक पूल पाडण्याचे काम नियोजित वेळेपूर्वीच्या 2 तास आधीच पूर्ण

Aprna

‘खीळे मुक्त झाडे’ तरुणांची अनोखी मोहिम

News Desk