HW News Marathi
मुंबई

प्रवीण परदेशी यांनी स्वीकारला पालिका आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त पदी प्रवीण परदेशी यांनी अयॉय मेहता यांच्याकडून आज (१३ मे) पदभार स्वीकारला आहे. परदेशींनी मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत होते. तर अजॉय मेहता यांनी राज्याच्या मुख्य सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

‘पावसाळ्यातील आव्हाने समोर असून मुंबईतील पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी विशेष लक्ष देणार, नालेसफाईची कामे त्वरीत मार्गी लावणार आणि मुंबईकरांना यंदाचा पावसाळा सुखकारक करण्याचा प्रयत्न करणार’ असल्याचे प्रवीण परदेशी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. तसेच कोस्टल रोड हा मुंबईकरांच्या हिताचा प्रकल्प आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प पूर्ण करू असा विश्वास नुतन मुंबई मनपा आयुक्त प्रवीण परदेशी यांनी व्यक्त केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वत:च्या मृत्यूवरही त्यांनी रेखाटले होते व्यंगचित्र

News Desk

फळ-भाज्या गटारात ठेवणाऱ्या फेरीवल्यांवर कारवाई

News Desk

बेस्ट संपाचा सहाव्या दिवशीही संप, लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही

News Desk