HW News Marathi
मुंबई राजकारण

पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान ‘या’ विकासकामांचे होणार लोकार्पण

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधानांचा हा दुसरा मुंबई (Mumbai) दौरा आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज (10 फेब्रुवारी) दोन ‘वंदे भारत’ (Vande Bharat Express) रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखविणार असून पायाभूत सुविधा प्रकल्प आणि अंधेरी पूर्व येथील सैफी अकादमीच्या संकुलाचे उद्घाटन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पंतप्रधानांचा मुंबई दौरा हा मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो.

दरम्यान, मुंबईच्या रस्त्यावर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांच्या कडे असणारी घरे आणि झोपड्या झाकण्यात आल्या आहेत.  मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत रेल्वे गाड्यात    पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. त्याचबरोबर वाकोला ते कुर्ला उन्नत मार्ग आणि एमटीएनएल जंक्शन ते एलबीएस उड्डाणपूर आणि कुर्ला व मालाड येथील भुयारी मार्गाचे उद्घाट पंतप्रधान हे डिजिटल माध्यमातून करणार आहेत.

पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे मुंबई पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात मुंबई पोलिसांच्या 100 जवान मरोळमध्ये तैनात करण्यात आला असून मुंबई पोलिसांचे पाच डीसीपी, 200 अधिकारी, 800 अंमलदार मोदी यांच्या तैनात करण्यात आले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याचा ठराव संमत; पृथ्वीराज चव्हाणांची नाराजी

Aprna

राज ठाकरे, विश्वजीत कदम एकत्र

swarit

फडणवीस सरकारचे सर्वच आलबेल, सामना,तून टीका

News Desk