HW News Marathi
मुंबई

शक्ती मिल बलात्कारप्रकरणी आरोपींना फाशी शिक्षा कायम | मुंबई उच्च न्यायालय

मुंबई | बलात्कारासारखे भयंकर गुन्हे करणाऱ्या आरोपींना कायद्यातील नव्या सुधारणेनुसार भारतीय दंडसंहिता कलम ३७६ (ई) अंतर्गत गुन्हेगाराला फाशीच्या शिक्षेची तरतूद केली. या कायद्यानुसार शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील तिन्ही आरोपींना फाशी शिक्षा सुनावली आहे. परंतु आरोपींनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने काल (३ जून) आरोपींची याचिका फेटाळून लावली असून शक्ती मिल प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबईतील शक्ती मिल कम्पाऊंड येथे २२ ऑगस्ट २०१३ साली विजय जाधव, मोहम्मद बंगाली, मोहम्मद अन्सारी आणि सिराज खान या नराधमांनी महिला छायाचित्रकारावर बलात्कार केला होता. याप्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपींना एप्रिल २०१४ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली. दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर बलात्काराच्या कायद्यातील कलम ३७६ (ई) मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. पहिल्यांदाच मुंबई सत्र न्यायालयाने शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता पुन्हा मुंबईत ‘ट्राम’ दर्शन

News Desk

कंत्राटदाराला मारहाण केल्याप्रकरणी अटक केलेल्या मनसे नगरसेवकाला जामीन मंजूर

News Desk

खोणी येथे टेम्पो अपघातात शाळेत जाणा-या एका अल्पवयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू तर दोन जण जखमी

News Desk