HW News Marathi
मुंबई

#PulwamaAttack : नालासोपाऱ्यातील ‘रेल रोको आंदोलन’ अखेर मागे

मुंबई | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात सीआरपीएफच्या ताफ्यावर दशतवाद्यांनी गुरुवारी (१४ फेब्रुवारी) झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले आहे. नालासोपाऱ्यात सकाळी ८ वाजल्पासून ते दुपारी १२ वाजेपर्यंत रेल रोको आंदोलन सुरू होते. पोलिसांनी अखेर बळचा वापर करून रेल रोको आंदोलन मागे घेतले. हे रेल रोको आंदोलन जवळपास ४ तासानंतर मागे घेण्यात आले. त्यामुळे चार तासांनतर नालासोपाऱ्याहून विरारकडे जाणारी लोकल वाहतूक सुरळीत सुरू झाल्या आहेत.

ऐन गर्दीच्या वेळी रेल रोको आंदोलन केल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले होते. नालासोपाऱ्यात नागरिकांनी रेल रोकोला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नालासोपारा रेल रोको आंदोलन जरी मागे घेतले असले तरी परिसरातील दुकाने, रिक्षा, वसई विरार पालिकेची बस सेवा, एसटी सेवाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. रेल्वे ट्रॅकवर नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती. या रेल रोको आंदोलनांमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्याेच वेळापत्रक विस्कळीत झाले होते. काही रेल्वे गाड्या नालासोपारा स्टेशन परिसरातच थांबल्या आहेत.

म्मू काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई- पुणे मार्गावर पेट्रोल टँकरला आग

News Desk

रविवारी रेल्वेच्या विविध कामांसाठी मेगाब्लॉक

News Desk

धोबीतलावं मध्ये आता गल्लोगल्ली फिरणार घंटागाडी

News Desk