मुंबई- राज्यभरात मंगळवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. पावसाच्या जोरदार पुनरागमनामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. उन्हाच्या झळांना त्रस्त झालेल्या मुंबईकरांना पावसाने मोठा दिलासा दिला आहे. मागील तीन चार दिवसांपासून मुंबईकर उन्हाने त्रस्त झाले होते. परंतु बुधवारपासून वातावरणात गारवा निर्माण झाल्याचे दिसून आले. दरम्यान, मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने कमबॅक केले आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात मध्यरात्रीपासून विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस सुरू आहे. तर अलिबाग, पेण, पनवेल, कर्जतमध्ये ही पावसाच्या सरी बरसल्या आहेत. पालघरमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडतो आहे. कोल्हापूर, नाशिक आणि लातुरातही मुसधळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. बीडमध्येही काल मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पावसानं शहरातील सर्व नाले ओसंडून वाहत आहेत. मुंबईमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस असला तरी त्याचा परिणाम रेल्वे सेवेवर झालेला नाही. तिन्ही मार्गावरील लोकल सेवा सुरळीत सुरू असल्याचं समजतं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.