HW News Marathi
मुंबई

क्रॉफर्ड मार्केटच्या दुसऱ्या टप्प्यातील पुनर्विकास कामाला गती मिळणार   

मुंबई | देशात सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या पालिकेच्या एकदम जवळ असलेल्या क्रॉफर्ड मार्केटचे काम रखडले होते. मात्र गाळेधारकांनी स्थलांतरित होण्याची तयारी दर्शवली आहे. अगोदर या स्थलांतरास विरोध झाल्याने महात्मा ज्योतिबा फुले मंडईच्या दुसऱ्या टप्प्याचे काम रखडले होते. परंतु आता मंडईतील १५० गाळेधारकांनी मंडईच्या मागील बाजूस स्थलांतरीत होण्याची तयारी दर्शविल्यामुळे आता मंडईच्या दुसऱ्या टप्प्याच्या पूनर्विकासाच्या कामाला गती येणार आहे.

या मंडईच्या पूनर्बांधणीच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरूवात होणार आहे. दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी १५० दुकानदारांना नोटीसा देवून त्यांना अन्यत्र स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्यानुसार संबंधित दुकानदारांना मंडईच्या पाठीमागील मटण विक्रेत्यांच्या बाजूच्या जागेत स्थलांतरीत करण्यात येणार आहे. मात्र व्यापाऱ्यांनी तेथे जाण्यास विरोध केला. त्यामुळे दुसऱ्या टप्प्याच्या पूनर्बांधणीची काम रखडले होते. बाजार आणि उद्यान समितीचे अध्यक्ष हाजी मोहम्मद हलीम खान यांनी या मंडईची पाहणी केली. त्यांनी तेथील व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या समस्यांचे निरसन केले. त्यानंतर दीडशे व्यापाऱ्यांनी स्थलांतरीत होण्यास समंती दिली. दुसऱ्या टप्प्यातील स्थलांतरी होणाऱ्या व्यापाऱ्यांना लॉटरी पध्दतीने पर्यायी जागा दिल्या जातील अशी माहिती समितीचे अध्यक्ष खान यांनी दिली.

स्थलांतराच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांचा बंद पडणारा व्यवसाय वाचला आहे. मंडईच्या पूनर्विकासाला आमचा विरोध नाही. मात्र गेल्या काही वर्षांपासून आम्ही या ठिकाणी व्यावसाय करीत आहे. त्यामुळे पूनर्विकासात आम्हाला योग्य जागा रास्त भाड्याने मिळायला हवी. धनदांडग्यांचा फायदा होईल असे निर्णय घेवू नये, पारंपरिक मुळ व्यावसाय टिकले पाहिजेत, अन्याय झालेल्या ४२ गाळेधारकांनाही न्याय मिळाला पाहिजे. अशी मागणी फळ व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नारायण चासकर यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मरे’ची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांनी रुळांवर उतरून केला प्रवास

News Desk

डबेवाल्यांच्या माध्यमातून प्रदुषण मुक्तीचा संदेश

swarit

पेट्रोल १५ पैशांनी, डिझेल १४ पैशांनी स्वस्त

News Desk