HW News Marathi
मुंबई

कुर्ला क्रांतीनगरचे पुनर्वसन करा, नगरसेवक संजय तुर्डे यांची मागणी

मुंबई | मुंबईत आगी लागण्याचे सत्र काही केल्या थांबत नाही. यात गरिबांची घरे जळून खाक होत आहेत. पण गरिबांचा निवारा गेला तर त्यांचा संसार उघड्यावर येतो. कुर्ला क्रांतीनगर या झोपडपट्टीला ३ जानेवारी २०१९ रोजी आग लागली. या आगीत जळून तीन वर्षाची अनुसया रामजोहर चौरसिया हिचा मृत्यू झाला. तर अनेक झोपड्याही जळून खाक झाल्या. झोपड्यातील रहिवाशांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी मनसे नगरसेवक संजय तुर्डे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

क्रांतीनगर दाटीवाटीने वसलेली वस्ती आहे. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी आत शिरू शकली नाही. त्यामुळे आग भडकली आणि आग तात्काळ विझवणे शक्य झाले नाही. परंतु सहारा एअरपोर्टवरील अग्निशमन दलाने वेळीच आग विझवण्याचे प्रयत्न केले व मोठी हानी टळली. भविष्यात अशा प्रकारच्या आगीची घटना घडू नये म्हणून क्रांती नगरातील झोपड्यांचे पुनर्वसन करण्यात यावे. गरिबांना त्यांच्या हक्काचे घर देण्यात यावे. अंतिम परिशिष्ट – २ लागून सुद्धा क्रांतीनगर झोपडपट्टीचे पुनर्वसन झाले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासदार संजय राऊत यांच्यावर बेळगावमध्ये गुन्हा दाखल

News Desk

उबरचे मुंबईतील कार्यालय कायमस्वरूपी बंद

News Desk

मुंबईत बत्ती गुल, ग्रिड फेल्युअरमुळे पूर्ण मुंबईत वीजपुरवठा खंडित

News Desk