HW News Marathi
मनोरंजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचा फर्स्ट लूक आऊट

मुंबई | बॉलिवूडमध्ये सध्या राजकीय नेत्यांच्या जीवन प्रवास बायोपिकच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे. यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बायोपिक येत आहे. या सिनेमाचे पहिल्या पोस्टरचे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. ‘पीएम नरेंद्र मोदी’ असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय हा प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

आठवड्या भरापूर्वी विवेकच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. गेल्या काही वर्षापसूनच विवेक हा फ्लॉप सिनेमा देत आहे. परंतु मोदींच्या या बायोपिकने त्यांच्या करिअरला नवीन वळण मिळणार असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे विवेकची निवड या भूमिकेसाठी कशी झाली याचे कुतूहल अनेकांना होती. त्यात आता पीएम नरेंद्र मोदी या बायोपिकच्या पहिल्या वहिल्या पोस्टरमध्ये विवेकला ओळखता देखील येत नाही आहे.

विवेकचा लूक हा हूबेहूब मोदींसारखा वाटत असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सिनेमा २३ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ओमंग कुमार या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून या महिन्यातच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. या सिनेमात विवेकसोबत अभिनेते परेश रावलदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Related posts

दिग्दर्शक राजकुमार हिरानीवर लैंगिक शोषणाचा आरोप

News Desk

सईच्या आयुष्यावरची थरारकथा ‘डेट विथ सई’  

News Desk

आगमन बाप्पाचे | गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर, मूर्तिकारांच्या हातांना वेग

Gauri Tilekar