HW News Marathi
मुंबई

सर्वोच्च न्यायालयाकडून प्रताप सरनाईकांना दिलासा!

ठाणे | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. टॉप ग्रुप सिक्युरिटी एमएमआरडीए आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने २४ नोव्हेंबरला प्रताप सरनाईकांसह मुलगा विहंग सरनाईक यांच्या घरावर छापेमारी केली होती. याप्रकरणी प्रताप सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिले आहे. सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या आदेशानुसार, प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांवर कुठलीही कारवाई करु नये, असे आदेश दिले आहेत.

ईडी सरनाईक कुटुंबाला चौकशीसाठी बोलवू शकते. मात्र त्यांना अटक करु शकत नाही, असेही यात नमूद करण्यात आले आहे.’कोणतीही कारवाई ही सूडबुद्धीने करू नये, असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. जेव्हा प्रताप सरनाईक यांची चौकशी होईल तेव्हा सरनाईक यांच्या वकिलांच्या उपस्थितीमध्ये चौकशीचे व्हीडिओ चित्रिकरण करता येणार आहे. मात्र, चौकशी दरम्यान कोणताही आवाज वकिलांना ऐकू येणार नाही, फक्त पाहता येणार असल्याचंही सुप्रीम कोर्टाने आदेशात म्हटलं आहे.

नेमकं प्रकरणं काय?

ईडीने मंगळवारी (२४ नोव्हेंबर) प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावून ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, आपण परदेशातून आल्याने आठ दिवस आपल्याला सक्तीने क्वॉरंटाईन राहावं लागत आहे.शिवाय विहंगची पत्नीही आजारी आहे. त्यामुळे मला चौकशीला उपस्थित राहता येणार नाही, असं सरनाईक यांनी ईडीला कळवलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे सरनाईक आज ईडीसमोर चौकशीला हजर राहणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

सरनाईक यांनी ईडीला पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती केली असली तरी अजून त्यावर ईडीने काही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ईडी काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.ईडीने सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलसह १० ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक मुंबईत नव्हते. ते भारताबाहेर होते. मात्र, ईडीचे छापे पडल्याचं कळताच ते भारतात आले आणि त्यांनी तडक प्रभादेवीतील ‘सामना’ कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. तब्बल दीड तास या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर बोलताना ईडीने कारवाई का केली? कशासाठी केली? याची काहीच कल्पना नसल्याचं सरनाईक यांनी सांगितलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ कारणाने पोलिसांनी मनसेच्या मोर्च्याचा मार्ग बदलला

swarit

सायन पनवेल महामार्गावर पाण्याची पाईप लाईन फुटली

News Desk

मंत्रालयात कर्मचारी, अधिकारी यांना मास्कशिवाय प्रवेश नाही

News Desk