HW News Marathi
मुंबई

आरपीएफ उपनिरीक्षकाच्या आत्महत्येचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद

मुंबई – कुर्ला रेल्वे स्थानकात आरपीएफच्या उपनिरीक्षकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. रमेश विठ्ठल मेश्राम (५०) असे या उपनिरीक्षकाचे नाव असून सोमवारी सकाळी कुर्ला रेल्वे स्थानकात ही घटना घडली होती. या आत्महत्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सध्या सर्वत्र वायरल होत आहे. मेश्राम यांच्यावर लोकमान्य टिळक शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

मेश्राम माटुंगा स्थानकातील कारशेडमध्ये कार्यरत होते. काही महिन्यापुर्वी या कारशेडमध्ये लोखंड चोरीची घटना घडली होती. एक ट्रकभर तांबे आणि पितळेचेया चोरीच्या प्रकरणावरुन माटुंगा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार नोंदविण्यात आली होती. या प्रकरणात ११ आरपीएफ अधिकाऱ्यांचे नाव पुढे आले असून मेश्राम हे त्यापैकीच एक आहेत. या सर्वांना निलंबित केले असून या सर्व प्रकरणाची संपूर्ण चौकशी वरिष्ठ आरपीएफ अधिकारी सुरेश अत्री करत आहेत.

या चौकशी मेश्राम यांना कुर्ला स्थानकातील आरपीएफच्या कार्यालयात यांना बोलविण्यात आले होते. कुर्ला स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. १ वर येणाऱ्या टिटवाळा लोकलसोमर यांनी उडी टाकून आत्महत्याचा प्रयत्न केला होता. देवाच्या कृपेने कोणताही वाईट घटना झाली नसून मेश्राम या घटनेत बचावले आहे. मात्र त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. वरीष्ठ आरपीएफ अधिकारी यांच्या त्रासला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे. मेश्राम शुद्धीत आल्यानंतर त्यांनी आत्महत्याचा प्रयत्न का? या संदर्भात चौकशी करण्यात येणार असल्याचे सेंट्रल रेल्वेचे उपायुक्त समाधान पवार यांनी सांगतिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेट्रो-३ मार्गिकेचे नयानगर-दादरपर्यंतचे भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण

News Desk

ऑनलाईन माहिती भरण्याची कामे आऊटसोर्सिंग करा

News Desk

भावा-बहिणीच्या ताटातुटीबद्दल पंकजांना खंत

News Desk