HW News Marathi
मुंबई

उद्यापासून रिक्षाचालकांचा बेमुदत संप

मुंबई | रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने मंगळवारपासून (९ जुलै) संप पुकारला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील अन्य मोठ्या शहरांमधील रिक्षाचालक या संपात सहभागी होणार आहेत. रिक्षा चालक-मालकांना पेन्शन, ग्रॅज्युईटी, वैद्यकीय मदत, भाडेवाढ तसेच ओला-उबर टॅक्सी कंपन्या तातडीने बंद करण्याच्या मागण्यांसाठी हा संप पुकारला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, रिक्षा चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर बेस्टकडून जास्तीत जास्त गाड्या रस्त्यावर उतरवल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

रिक्षा मालक चालक संघटनेकडून मंगळवारपासून पुकारलेल्या संपाला काही संघटनांचा पाठिंबा आहे तर काही संघटनांचा विरोध आहे. लालबावटा रिक्षा युनियन डोंबिवली, स्वाभिमान टॅक्सी संघटना या संघटनांनी या संपाला आपला पाठिंबा दर्शविला असून रिक्षा क्रांती संयुक्त कृती समिती आणि भाजप प्रणीत नवभारतीय शिववाहतूक या संघटनेने या संपास विरोध दर्शविला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धर्मा प्रोडक्शनच्या गोदामाला मध्यरात्री भीषण आग

News Desk

मुंबईला पाणी पुरवठा करणारी चारही धरणे ओव्हरफ्लो

News Desk

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे निधन

News Desk