HW News Marathi
मुंबई

टिकटॉक फेम फैझल शेखसह ४ जणांवर गुन्हा दाखल

मुंबई | “तबरेझ अन्सारीची हत्या केली पण त्याच्या मुलाने या हत्येचा बदला घेतला तर मुसलमान आतंकवादी आहे असे म्हणू नका”, अशा आक्षेपार्ह आशयाचा व्हिडिओ बनविणाऱ्या टिकटॉक फेम फैझल शेख यांच्यासह त्याच्या अन्य ४ सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय विद्यार्थी सेनेचे संपर्कप्रमुख रमेश सोळंखी यांनी लोकमान्य टिळकनगर पोलीस ठाण्यात या ५ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मॉब लिचिंगमध्ये हत्या झालेल्या तरबेझ अन्सारीचा उल्लेख असलेला आक्षेपार्ह व्हिडीओ केल्याप्रकरणी फैझल शेखसह ४ जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवून लोकांमध्ये चुकीचा संदेश पसरविला जात असल्याचे म्हणत रमेश सोळंखी यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

करी रोड, एल्फिन्स्टन ब्रिज १५ दिवसांसाठी ‘वन वे’

swarit

#CoronaVirus | वरळी कोळीवाड्यात कोरोनाचा पहिला बळी

News Desk