HW News Marathi
मुंबई

राजा उदार झाला आणि हाती भोपळा आला, ही म्हण केंद्राला तंतोतंत लागू होते – रोहित पवार

मुंबई | केंद्राने जीएसटीचा केलेला बोजवारा अशो किंवा राज्याला न दिलेला निधी असो. वारंवार राज्य सरकार केंद्राकडे निधीची मागणी करत असतानाही ती पुर्ण होताना दिसत नाही आहे. यावरुन आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी केंद्रावर निशाणा साधला होता. आथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत केंद्राला टोला लगावला आहे.

रोहित पवारांनी ट्विट करत अशे म्हटले आहे की, राजा उदार झाला आणि हाती भोपळा आला असं म्हणताना देवेंद्र फडणवीस आपण चुकुन PM ऐवजी CM म्हणालात. कारण ही म्हण केंद्राला तंतोतंत लागू होते. पण आता येत्या जीएसटी काऊन्सिंलच्या बैठकीनंतर तरी हाती भोपळा न देता राज्याला हक्काचा निधी द्यावा ही अपेक्षा आहे, असे ट्विट तत्यांनी केले आहे.

केंद्र सरकार जीएसटी भरपाईची रक्कम वेळेत देत नसल्याचे तीव्र पडसाद जीएसटी परिषदेच्या सोमवारच्या बैठकीत उमटले. केंद्राच्या सूचनेनुसार कर्ज काढण्यास भाजपची सत्ता नसलेल्या १० राज्यांनी विरोध दर्शविला आणि केंद्रानेच कर्ज काढून आमची रक्कम लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी या राज्यांनी केली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंधेरी पोटनिवडणुकीत मालपा डोंगरीमध्ये जाऊन आशिष शेलारांनी मतदारांची घेतली भेट

Aprna

मुंबई उपनगर जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांसाठी मोफत वाहन सुविधा

News Desk

बेस्ट कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह,इतर कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला

News Desk