HW News Marathi
मुंबई

गणेश विसर्जनावेळी बेपत्ता झालेल्या साईशचा मृतदेह सापडला

मुंबई | यंदा लालबागच्या राजाच्या विसर्जना दरम्यान बोट उलटल्याची घटना घडली होती यावेळी बेपत्ता झालेल्या साईश मर्दे या पाच वर्षांच्या मुलाचा शनिवारी मृतदेह सापडला आहे. राजभवनाजवळ किनाऱ्यावर साईशचा मृतदेह सापडला आहे. २४ सप्टेंबर रोजी लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी साईश ज्या बोटीत होता, ती बोट समुद्रात उलटली होती. लालबागच्या राजाच्या विसर्जना नंतर साईश बेपत्ता होता.

पालघरचा असलेला साईश त्याच्या कुटुंबीयांसोबत लालबागच्या राजाचे विसर्जन बघण्यासाठी लालबागला आला होता. साईशचा मामा लालबागला राहत असल्याने तेथे त्यांनी मुक्काम केला. सोमवारी लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यासाठी राजाच्या तराफासोबत कोळी बांधवाच्या काही बोटी देखील खोल समुद्रात गेल्या होत्या. या बोटींपैकी एक बोट विसर्जनाच्यावेळी उलटली होती. त्याच बोटीत साईश त्याच्या आई व बहिणीसोबत बसलेला होता. बोट उलटल्यानंतर साईश बेपत्ता झाला होता. तेव्हापासून नौदल, तटरक्षक दल, हवाई दल त्याचा शोध घेत होते. अखेर पाच दिवसांनंतर साईशचा मृतदेह सापडला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी कर्जमाफीसाठी उत्तरप्रदेश मॉडेलचा अभ्यास – मुख्मयंत्री

News Desk

उद्यापासून रिक्षाचालकांचा बेमुदत संप

News Desk

उदय सामंत आणि संभाजी राजेंच्या बोटीला अपघात; सुखरुप बचावले

Aprna