HW News Marathi
मुंबई

संघ आमचा आई बाप आहे परिषदेत चंद्रकांत दादांची दादागिरी

मुंबई | आमदार प्रशांत परिचारक यांच्यावरील निलंबन मागे घेण्याच्या प्रस्तावाला सहमती कोणत्या विचारधारेने दिली. असा सवाल आमदार कपिल पाटील यांनी परिषदेत उपस्थित करताच महसूलमंञी चंद्रकांत पाटील यांचा पारा चढला. आणि आक्रमक आवाजात विचारधारेवर बोलाल तर याद राखा, आम्ही एेकूण घेणार नाही, संघ आमचा आई बाप आहे. अशा शब्दात दादागिरीच सुरू केली. चंद्रकांत दादांच्या या आक्रमक पणाच्या विरोधात विरोधकही उभे राहिल्यानंतर मला शरद पवांरावर बोलायला लावू नका असा दमही विरोधकांना भरला.

जवांनाबाबत केलेल्या वक्तव्यावरून आमदार प्रशांत परिचारक यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र निलंबन कायम ठेवण्याच्या संदर्भात बोलत असताना आमदार कपिल पाटील यांनी काही प्रश्न उपस्थित करण्यास सुरूवात केली. प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव कोणत्या विचार धारेतून आला असा सवाल उपस्थित करताच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पारा चढला.

आणि विचार धारेवर बोलाल तर याद राखा, संघ आमचा आई बाप आहे. अशी आक्रमक भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडण्यास सुरूवात केली. त्यावर विरोधकांनीही चंद्रकांत दादां ही भूमिका बरी नव्हे असा सूर आवळला. त्यामुळे चंद्रकांत दादांच पारा आणखीच चढला. आणि त्यानी चक्क राष्ट्रवादीलाच आव्हान दिले की शरद पवारांवर बोलू का मी असा सज्जड दम ही विरोधकांना दिला.

आक्रमक झालेल्या चंद्रकांत दादांची समजूत घालण्याचा प्रयत्न संसदीय कार्यमंत्री गिरीश बाबट करीत होते पण दादांचा पारा एवढा चढला होता की ते काही एेकूण घेण्याच्या मनस्थितीतच दिसत नव्हते. या सर्व गोंधळात सभापतींनी परिषदेचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतर आलेल्या पिठासिन अधिकाऱ्यांनी सभागृह दिवसभारासाठी तहकूब केले. या सर्व प्रकारानंतर उद्या सर्वांनी एेकायची तयारी ठेवा मी बोलणार आहे अशा इशाराही चंद्रकांत दादा यांनी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘अंधेरीच्या राजा’चे आज विसर्जन

News Desk

पुढच्या काळात फुटाफूट नको म्हणून राज ठाकरे सरसावले  

News Desk

दादरमध्ये शिकता येणार अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदचे कोर्सेस

News Desk