HW News Marathi
मुंबई

धारावीत पोलीसांच्या संरक्षणासाठी ‘सॅनिटाझेशन टेंट’ची सोय

मुंबई | मुंबईतील कोरोनाचे हॉटस्पॉट होत चाललेल्या धारावीत पोलिस कडक बंदोबस्त ठेवून आहे. परंतू, कोरोनाशी दिवस रात्र दोन हात करणाऱ्या पोलीसांच्या आरोग्याकडेही लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. हेच लक्षात घेत धारावी पोलिस ठाण्याच्या बाहेर सॅनिटायझेशन टेंट उभारण्यात आला आहे. त्यामूळे पोलिसांना दिलासा मिळाला आहे.

धारावीतील स्थानिक खासदार राहूल शेवाळे यांनी पोलीसांच्या संरक्षमासाठी हा टेंन्ट उभारला आहे. यात पोलीसांना विशेष हेल्मेटही देण्यात येणार आहे आणि मास्कही पुरवण्यात येणार आहे. या टेंटमध्ये पोलीसांना अगदी थोड्याच वेळात निर्जंतूक करुन घेता येणार आहे. त्यामूळे पोलीसांना काम करताना कोरोनापासून बचाव होण्यास या टेंटची मदत होणार आहे. तसेच, धारावी परिसराती रुग्णालये आणि इतर भागातही हे टेंट उभारण्यात येणार असल्याची माहिती राहूल शेवाळे यांनी दिली. या संदर्भात त्यांनी ट्विटही केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने नो गो झोनमध्येही वाढ

News Desk

माटुंगा रोड स्टेशनजवळील पादचारी पुलाला तडे

News Desk

संविधानाला हात लावाल तर खबरदार; देशातील विरोधीपक्ष नेत्यांचा संविधान बचाव रॅलीत इशारा

swarit