HW News Marathi
मुंबई

मुलगी वाचवा मुलगी शिकवा संदेश देणारी मोटार सायकल रॅली

वसई | ६९ व्या प्रजाकसत्ता दिनाचे अौचित्या साधून महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने ‘मुलगी वाचवा मुलगी शिकवा’ संदेश देणारी भव्य मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रेली नालासोपारा येथे काढण्यात आली असून सकाळी १० वाजता या रॅलीला सुरुवात झाली.

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हा सुविचार सर्वांच्या परिचयाचा आहे. या एका ओळीतच सर्व काही आहे. पण, या ओळीचा अर्थ आपण काही अजून ही समजलो नाही. आपण २१व्या शतकात जगत आहोत. हे आधुनिक जग म्हटले जाते. खरे पण या जगात आज ही मुलीचा जन्म झाला तर तिला मारले जाते. भारतात आज ही स्त्री भ्रूण हत्याचा अकडा झालेला नसून कमी यात वाढ होताना दिसत आहे. याला विरोध करण्यासाठी ही रॅल काढण्यात आली.

या रॅलीच्या माध्यमातून मुलगी शिकली प्रगती झाली, स्त्री भ्रूण हत्या टाळा, बेटी बचाव आणि मुलगी वाचवा मुलगी शिकवा असा संदेश देण्यात आला.

प्रगतीनगर,नारियानगर,मोरेगाव, नागिनदास पाडा, विजयनगर, राधाकृष्ण हॉटेल, तुळींज रोड, महेशपार्क, अंबावाडी, गालानगर सर्कल, द्वारका हॉटेल, आचोळे तलाव, भवानी पार्क, फायरब्रिगेड सर्कल,अल्कापुरी,चंदननाका,नालासोपारा पूर्व फ्लायओव्हर ब्री्ज खालून, रामदेव झेरॉक्स सर्कल वरून, नालासोपारा पश्चिम-सिविक सेंटर, नालासोपारा पोलीस स्टेशन, समेळपाडा, चक्रेश्वर तलाव सोपारा गाव येथे मोटार सायकल रॅली दुपारी दीड वाजता समाप्त झाली.

या मोटार सायकल रॅलीत अमोल भालेराव,अनिल गोविलकर, अमोल हातानकर, रमेश सावंत, सखाराम जंगम, दिनेश थुल, महेंद्र बडबे, गणेश कदम, विनोद राघव, मंगेश आंग्रे मनसेचे आदी मान्यवर मंडळी देखील यात सहभागी झाले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हाजी अली दर्ग्याचे लवकरच होणार सौंदर्यीकरण

swarit

प्रेयसीचा दोनदा गर्भपात करणाऱ्या प्रियकराला अटक

News Desk

धक्कादायक ! गियर म्हणून चक्क बांबूचा वापर

News Desk