HW News Marathi
मुंबई

राष्ट्रसेवा दलाकडून सावित्रीबाईंच्या विचारांचा जागर

मुंबई | सावित्रीबाई फुले यांनी अनेक अडचणींना सामोरे जात त्याकाळात महिलांना शिकवायचा विडा उचलला. पहिल्या महिला शाळेची निर्मिती केली. अशा या महान स्त्रीला मानवंदना म्हणून आज 3 जानेवारी रोजी जन्मदिनानिम्मित राष्ट्र सेवा दलाकडून सावित्री उत्सव साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम गेल्या आठ वर्षांपासून सुरू आहे. दादर येथील छबिलदास हायस्कुल येथे कार्यक्रम पार पडला. या उत्सवात सावित्रीच्या लेकी आणि सावित्री संस्था पुरस्कार वितरीत करण्यात आला.

3 जानेवारी सावित्रीबाई यांची जयंती. ती दिवाळीसारखी साजरी झाली पाहिजे. महिलांसाठी त्यांनी केलेले कार्य हे खूप मोठे होते. यामुळे प्रत्येक घरात कंदील आणि पणती लावून हा दिवस साजरा करावा असे आवाहन दलातर्फे केले जाते. या उत्सवाला अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, चिन्मयी सुमित यांनी देखील पाठींबा दिला आहे. तसेच यावेळी सावित्रीबाई ज्याप्रकारे चिरी कुंकू लावत तसा कुंकू लावत महिला त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत.

सातपुड्याच्या जंगलात जल,जंगल आणि जमीन या प्रश्नावर आदिवासी शेतकऱ्यां मध्ये काम करणारी आणि नुकताच ठाणे ते मुंबई लॉंगमार्च काढून आदिवासीं शेतकऱ्यांचे प्रश्न लोकांसमोर मांडणाऱ्या प्रतिभा शिंदे,

विद्याविहार येथील लोकांना संघटित करून माहुलमधील प्रकल्पग्रस्त लोकांच्या नरकयातना समाजासमोर आणणाऱ्या अनिता ढोले, लग्नाच्या पहिल्या रात्री होणाऱ्या कौमार्य चाचणी या प्रथेकविरोधात संघर्ष करणारी प्रियांका तमायचीकर यांना सावित्रीच्या लेकी हा पुरस्कार देण्यात आला.

दिवाळी म्हणजे फटाक्यांचा आवाज,वायू प्रदूषणाचा त्रास यावर सर्वोच्च न्यायालयाला आदेश दयावे लागले यावर ७५० कुटुंबाच्या लोअर परळ येथील संयुक्त नवी चाळीने दिला नविन पर्याय फटाके विरहित सांस्कृतिक दिवाळी साजरी केली. तसेच ९० टक्के मुस्लिम विद्यार्थी असलेल्या साकीनाका येथील लोकमान्य विद्या मंदिराच्या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी परिसराची स्वच्छता,पर्यावरण आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी स्थापन केलेल्या नेचर क्लब च्या माध्यमातून शाळे बाहेरच्या नव्या प्रयोगाची ओळख या दोघांना सावित्री संस्था पुरस्कार देण्यात आला. अशी माहिती राष्टीय सेवा दलाचे शरद कदम यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिक्षकांवर विद्यार्थ्याने केला कोयत्यानी हल्ला

News Desk

पेंग्विनमुळे राणीच्या बागेत पर्यटक वाढले

News Desk

दाऊदच्या कोट्यवधी संपत्ती विकत घेण्यासाठी 12 जण इच्छुक

News Desk