HW News Marathi
मुंबई

फेसबुकवरुन फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, भेटायला बोलवून ५ लाखांना लुटले

मुंबई | पार्किंगच्या वादातून हात उचल यांचा सूड घेण्यासाठी मुलीच्या नावाने फेसबुकवर अकांऊट तयार केले. त्यांनी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मैत्री केली. त्यानंतर त्या व्यक्तीला बोलवून बेदाम मारहान करुन ५ लाखाचा लुटले असल्याचा प्रकारसमोर आला आहे. हा सर्व प्रकार चेंबूर येथील माहूल गावातील परिसरात राहणारा हितेंद्र उर्फ बाबू ठाकूर यांचा डेकोरेशनचा व्यवसाय आहे.

८ जानेवारी रोजी यांना एका मुलींची फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि त्यांनी ती स्वीकारली. त्यानंतर दोघांचे फेसबुकवर मेसेजवर बोलणे सुरू झाले. मग, मुलींने ठाकूर यांना गोवंडी येथे भेटण्यासाठी बोलवले. ते तेथे पोहचले असून लांबून एका मुलीने हात दाखवून त्यांना बोलवले. फेसबुकवरुन मैत्री झालेली हिच ती मुलगी असावी अशा आशेने ठाकूर तिच्या दिशेने जात असताना. अचानक पाच ते सहा जणांनी एकत्र येऊन लोखंडी रॉड आणि स्टंपने त्यांना चोप दिला असून त्यांच्याकडील ५ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले.

देवनार पोलिसांनी ठाकूर यांच्या तक्रारीवरुन दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात पोलिसांनी ३ जणांना अटक केले आहे. पोलिसांनी तपासानंतर कळाले की, आरोपीच्या काकावर हात उचला होता. याचा सूड घेण्यासाठी आरोपीने मुलीच्या नावाने बनावट फेसबुक अकांऊट उघडून यातून ठाकूर यांची फसवणूक केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य रेल्वेतील अंबरनाथ-बदलापूर स्थानका दरम्यान रेल्वे रुळाला तडे

News Desk

सरबजित सिंगला न्याय मिळणार ?

News Desk

BMC Elections: मुंबई पालिकेसाठी भाजपचा पुढचा प्लॅन काय?

Manasi Devkar