HW News Marathi
मुंबई

पेण अर्बन बँकेतील ज्येष्ठ नागरिक ठेवीदारांचा ‘वर्षा’वर धडक मोर्चा

मुंबई | पेण अर्बन बँकेतील ज्येष्ठ नागरिक ठेवीदार आणि आमदार धैर्यशील पाटील यांच्या आंदोलनाला नरिमन पॉईंट येथे पोलिसांनी अडविले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ज्येष्ठ नागरिकांचा धडक मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनात आमदार धैर्यशील पाटील, समितीचे नेते नरेंद्र जाधव, दत्तात्रेय मसुरकर, शिरीष बिवरे आणि काही आंदोलनकर्त्यांना राज्य सरकार विरोधी निदर्शने करत असल्याने मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना राजभवन पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यातील पेण को ऑप.अर्बन बँक घोटाळा प्रकरणात शासन दुर्लक्ष करीत असल्याने हजारो ठेवीदार सभासद ग्राहकांना त्यांच्या हक्काचे, कष्टाचे पैसे मिळत नाहीत. वारंवार आंदोलने करून देखील कोणीही दखल घेत नाही. आता पेण चे आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धरणे आंदोलन सुरू केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवरील सोयीसुविधांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

Aprna

शेतीसाठी माहिती तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते | व्यंकय्या नायडू

Gauri Tilekar

गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबईकरांची योगासने

News Desk