HW News Marathi
Covid-19

सेन्ससेक्स १००० अकांनी कोसळला , शेअर बाजारात घसरण

मुंबई | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेले पाच दिवस केंद्र सरकारचे आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केले. या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये बहुतांश उद्योगांना आर्थिक मदत न मिळाल्याने उद्योगांची पुरती निराशा झाली. त्यातच करोना व्हायरसवरून चीन आणि अमेरिका या देशांमधील तणाव वाढल्याचे भांडवली बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आजच्या सत्रात बँक आणि वित्त संस्थांच्या शेअरमध्ये विक्रीचा मारा सुरु आहे. सकाळी सेन्सेक्स १०४५ अंकांनी कोसळला आणि ३००५२ अंकांपर्यंत खाली आला आहे. निफ्टीत ३०९ अंकांची घसरण झाली असून तो ८८२७ अंकांवर आहे. आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये ३.४४ टक्क्यांची घसरण झाली. बजाज फायनान्स, ऍक्सिस बँक, एसबीआय, इंडसइंड बँक आदी शेअर २ टक्क्यांनी कोसळले आहे. विक्रीमुळे निर्देशांकात घसरण सुरु असून, गुंतवणूकदारांचे किमान तीन लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

दुसरीकडे आयटीसीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा, इन्फोसिस, एचयूएल आदी शेअर तेजीत आहेत.आशियातील प्रमुख शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती पाच आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर गेला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लहान मुलांमधील वाढता कोरोना संसर्ग धोकादायक, शिवसेना खासदाराचे थेट मोदींना पत्र

News Desk

कोरोनामुक्त झालेल्यांना ९ महिन्यांनी लस द्या ! केंद्र सरकारच्या पॅनलचा सल्ला

News Desk

मुंबई, पुण्यातून बाहेर जाण्यास किंवा आत येण्यास परवानगी नाही

News Desk