मुंबई | नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होताच मुंबई शेअर बाजाराने नवा इतिहास रचला आहे. अवघ्या काही मिनिटांतच सेन्सेक्सने ३९ आकडा ओलांडला. तर तर निफ्टीही ११ हजार ७०० पर्यंत पोहोचला. शेअर बाजारात पहिल्यांदाच सेन्सेक्सने हा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. सेनसेक्सने हा रेकॉर्ड मागील २९ ऑगस्ट २०१८च्या तुलनेत अधिक होता.
Sensex touches all time high, crosses 39,000 mark. It is currently at 39,007.95, up by +335.04 points. pic.twitter.com/SBNqkF7dmn
— ANI (@ANI) April 1, 2019
मागील वर्षी ऑक्टोबर २०१८ मध्ये निफ्टी १० हजार पर्यंत पोहचला होता. शेअर बाजारातल्या उसळीमुळे पीएसयू बँक, ऑटो आणि मेटल इंडेक्स यांचे शेअरचे भाव वधारले असून टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर ओएनजीसी आणि कोल इंडियाच्या शेअर्समध्ये १ टक्क्यांनी घट झाला आहे.
आरबीआयद्वारे व्याजदरातील रेपो रेटमध्ये घट होण्याची अपेक्षा आहे. याआधी ७ फेब्रुवारी रोजी रेपो रेटमध्ये ६.५० टक्क्यांवरुन ६.२५ टक्क्यांपर्यंत घट करण्यात आली होती. तसेच भारतात सुरु असणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर शेअर बाजारात अनेक उलाढाली होत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.