HW News Marathi
मुंबई

रेल्वेचे ट्रॅकमन करतायत अधिकाऱ्यांची सेवा!

पुणे : रेल्वे अपघातांना कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या कारणीभूत असल्याची ओरड रेल्वे प्रशासनाकडून होत असताना, उपलब्ध कर्मचाऱ्यांना मात्र रेल्वे अधिकाऱ्यांच्या सेवेत जुंपण्यात आले आहे. लोहमार्गाच्या दुरुस्ती देखभालीच्या कामासाठी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी (ट्रॅकमन) अनेक जण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी चाकरीवर असल्याची माहिती हाती लागली आहे. पुण्यामध्ये विविध जागांवर नियुक्त झालेले दीडशेहून अधिक कर्मचारी अधिकाऱ्यांच्या दावणीला असल्याचे कळते.

 

रेल्वे अपघातांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लोहमार्ग देखभालीचा प्रश्न गंभीर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वीन लोहानी यांनी रेल्वेच्या सर्व विभागांना लेखी आदेश पाठविले आहेत. निवासस्थान किंवा कार्यालयात कार्यरत असलेल्या सर्व ट्रॅकमनला तातडीने लोहमार्ग दुरुस्ती, देखभालीच्या कामावर पाठविण्यात यावे, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी तांत्रिक कामांचे कर्मचारी चाकरीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रेल्वेची वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा घटक ट्रॅकमन असतो. दिलेल्या ठराविक अंतरामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याकडून लोहमार्गाची दररोज तपासणी केली जाते. रुळाचे सांधे योग्य पद्धतीने जुळले आहे का, भराव योग्य स्थितीत आहे का, रूळ आणि स्लीपरच्या दरम्यान लावलेले जोड आदी गोष्टी सातत्याने तपासाव्या लागतात. त्या योग्य स्थितीत नसल्यास तातडीने दुरुस्ती केली जाते. या महत्त्वाच्या कामांसाठी नियुक्तअनेक कर्मचाऱ्यांना मूळ कामावर न ठेवता अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी किंवा कार्यालयीन कामाच्या दावणीला बांधले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बदलापूरमधील केमिकल कंपनीला भीषण आग

News Desk

युतीच्‍या चर्चेला आजपासून सुरूवात – मुंबई भाजपा अध्‍यक्ष आशिष शेलार

News Desk

पेट्रोलपंपावर मध्यरात्रीपासून डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वीकारले जाणार नाही

News Desk