HW News Marathi
मुंबई

गणेशोत्सवाचं भक्तांचा उत्साह शिगेला

मुंबई : गेल्या महिन्याभरापासून ज्याच्या आगमनाची वाट अवघा महाराष्ट्र पाहात होता, त्या गणेशाचे आगमन अखेर शुक्रवारी झाले. अधूनमधून कोसळणाऱ्या रिमझिम सरी, ढोल ताशाच्या गरजात सुरू असलेला बाप्पा मोरयाचा जयघोष आणि उदंडउत्साह याने राज्यभर अनोखे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई- पुण्यातील रस्ते तर गणेशाच्या आगमनासाठी गर्दीने फुलून गेले आहेत. घरगुती गणेशांसोबतच सार्वजनिक गणेशमंडपांमध्येही मोठी लगबग सुरू आहे. त्यातच न्यायालयाने ध्वनिक्षेपकांवरील आवाजाच्या मर्यादा शिथिल केल्यामुळे जागोजागगणेशाच्या गाण्याचे स्वर घुमत आहेत. पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीची प्रतिष्ठापना नुकतीच झाली आहे. तर दगडूशेठ हलवाईच्या गणपतीचीही प्राण प्रतिष्ठापना लवकरच होत आहे. मुंबईतील लालबागचा राजा, गणशेगल्ली येथील गणपतींचा प्रतिष्ठापनाही दुपारपर्यंत सुरू होती. प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात आरतीसाठी भाविकांनी गर्दी केली होती. दुपारपर्यंत करा स्थापना श्रीगणेशाची स्थापना व पूजन करण्यासाठी आज प्रात:कालपासून दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपर्यंत शुभवेळ असल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. तसेच, यावर्षी पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन मंगळवारी होत असले, तरीही ते त्याच दिवशी करावे. गणेशमूर्ती विसर्जनाचा आणि मंगळवारचा काहीही संबंध नाही, असेही सोमण यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

19 ते 22 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होण्याची शक्यता

News Desk

मालवणी येथे 152 ग्रॅम कोकेनसह नायझेरियन तस्करांना अटक

News Desk

पीडितांना मिळणार तात्पुरता निवारा

News Desk