मुंबई | गेल्या तीन महिन्यांपासून राज्यासह मुंबईमध्ये सुरू असलेला कोरोना विषाणूचा कहर अद्याप कमी झालेला नाही. दरम्यान, सर्वसामान्य जनतेला कोरोनाच्या प्रकोपापासून वाचवण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलिस तसेच पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी झटत आहेत. मात्र अशा अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही वाढत्या संक्रमाणामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेचे प्रभारी उच्चायुक्त शिरीश दीक्षित यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दीक्षित पालिकेच्या पाणी पुरवठा विभागामध्ये मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.
A senior official of BMC who had tested positive for #COVID19 has lost his life. He was deployed in the water supply department: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) pic.twitter.com/GSqWkCuJ1F
— ANI (@ANI) June 9, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.