HW News Marathi
देश / विदेश मुंबई राजकारण

आदित्य ठाकरेंनी मुंबईतील वायू प्रदूषणासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांना लिहिले पत्र; म्हणाले…

मुंबई | मुंबईच्या वायू प्रदूषणासंदर्भात शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केंद्रीय मंत्री भूपेंदर यादव (Bhupender Yadav) यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून आदित्य ठाकरेंनी मुंबईतील हवेच्या गुणवत्तेला AQI वर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईच्या हवेची पातळीही दिवसेंदिवस खालवत चाललेली आहे. यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी पत्राद्वारे केली आहे. आदित्य ठाकरेंनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहिल्यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे.

आदित्य ठाकरेंनी पत्र ट्वीट करताना म्हणाले, “पूर्णवेळ पर्यावरण मंत्र्याची अनुपस्थिती आणि राज्याच्या बेकायदेशीर सरकारमधील सार्वजनिक समस्यांबद्दल संवेदनशीलतेचा अभाव यामुळे हे संकट अधिकच बिकट झाले आहे. कारण जमिनीवर कोणतीही कारवाई होत नाही. बीएमसीची स्टडी कमिटी आणि स्मॉग टॉवर्सची कृती ही केवळ त्याच्या कंत्राटदारांच्या फायद्यासाठी युती केली आहे. मला तुमच्याकडून अशी आशा आहे की, या पत्राला तुम्ही लक्ष द्यावे” अशी मागणी करत शिंदे सरकारवर त्यांनी आरोप केला आहे.

आदित्य ठाकरेंनी पत्रात नेमके काय म्हणाले

“महाराष्ट्रातील शहराच्या हवेची पातळी घसरत चालली असून परिस्थिती ही गंभीर तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी मी पत्र लिहित आहे. यामुळे नागरिकांच्या जीवानावर परिणाम करत आहे. या वायू प्रदूषणाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी धोरणात्मक पातळीवर फारशी प्रगती होताना दिसत नाही. याचा परिणाम, शहरातील ताजी हवा आणि ऑक्सिजनच्या कमतरता आहे. राज्याला सध्या स्वतंत्र कार्यभार पाहाणारा पर्यावरण मंत्री नाही. तुमच्यामाध्यमातून केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याशिवाय माझ्याकडे दुसरा मार्ग नाही”, असे आदित्य ठाकरेंनी केंद्रीय मंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

 

 

Related posts

किरीट सोमय्या ‘नॉट रिचेबल’

News Desk

महाराष्ट्रातलं सरकार पाडायची हिंमत कोणाच्याही बापात नाहीये!

Arati More

अजित पवार राज ठाकरेंची भेट घेणार का ?

News Desk