HW News Marathi
मुंबई

शिवसेना नेते सचिन सावंत यांची गोळ्या झाडून हत्या

मुंबई | मुंबईमध्ये शिवसेनेचे नेते सचिन सावंत यांची रविवारी रात्री गोळी झाडून अज्ञान इसमाने हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी रात्री कांदिवलीच्या गोकुळ नगर परिसरात घडली. यावेळी दुचाकीवरुन जाणा-या दोन अज्ञात इसमानी सावंत यांच्यावर गोळ्या झाडल्या. व्यावसायिक वादातून ही हत्या झाल्याचे सध्या बोलले जात आहे.

हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्यानंतर ४६ वर्षीय सचिन सावंत यांना बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सावंत यांना मृत घोषित केले. मिळालेल्या माहीती नुसार यापूर्वी देखील सचिन सावंत यांच्यावर हल्ला झाला होता.

शिवसेनेचे कट्टर नेते अशी त्यांची ओळख होती. सध्या शिवसेनेचे उपशाखा प्रमुख म्हणून ते कार्यरत होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे. या आधी अहमदनगर आणि भीवंडीत शिवसेना नेत्यांची हत्या झाल्यानंतर सचिन सावंत यांची गोळ्या झाडून रविवारी हत्या झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

Related posts

करी रोड-एल्फिन्स्टन रोडवर शिवसेनेचे आंदोलन

swarit

नवी मुंबई महापालिकेवर आयकर विभागाची २४ तास झाडा-झडती

News Desk

जाणून घ्या…बेस्ट प्रशासनाच्या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

News Desk