HW News Marathi
राजकारण

महागाई विरोधात काँग्रेसची १० सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक

मुंबई | महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसने येत्या १० सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या या भारत बंदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी होणार आहे. आज ८ सप्टेंबर रोजी झालेल्या काँग्रेसच्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या सोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक देखील उपस्थित होते.

यावेळी संजय निरुम यांनी बंदमध्ये अनेक विरोधी पक्षांना सहभागी होण्यास सांगितले. तसेच संजय निरुपम यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील या बंदमध्ये सामील होण्याचे सांगितले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या आंदोलनाची धार अधिक वाढणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सामान्यांना चांगलाच फटका बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दरांमध्ये लागोपाठ थोडी-थोडी वाढ होत आहे. त्यातच आता विरोधकांना सरकारच्या विरोधात चांगलेच हत्यार सापडले आहे. काँग्रेसने वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दरांविरोधात १० सप्टेंबरला भारत बंदची घोषणा केली आहे.

पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

  • काँग्रेस पक्षाच्या वतीने १० सप्टेंबरला भारत बंदचा इशारा.
  • महागाईविरोधात (विशेषतः इंधन दरवाढ) आंदोलन.
  • काँग्रेससोबत राष्ट्रवादी, सिपीआय, सिपीआयएम, जनता दल, शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हे देखील यात सामील असणार आहेत.
  • मुंबईतील सर्व बँका सोमवारी बंद राहणार आहेत. बँक युनियनची घोषणा, विमा कंपन्यादेखील बंद राहतील.
  • मुंबईचे पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनचे देखील या बंदला समर्थन.
  • मुंबईतील जवळपास ३६ मोठे बाजारदेखील बंदमध्ये सामील.
  • रिक्षा आणि टॅक्सी युनियन देखील सामील.
  • रिक्षा आणि टॅक्सी युनियन कडून बंदला सर्मथन.
  • जेव्हा पासून मोदी पंतप्रधान झाले इंधन दरवाढीचे प्रमाण वाढले.
  • संपूर्ण देशात सर्वात महाग पेट्रोलची विक्री महाराष्ट्रात म्हणजेच ८९.३ पैसे प्रति लिटर
  • इंधनाचे भाव कमी करणे सरकारसाठी अशक्य नाही.
  • डिझेल पेट्रोलवर मोठ्या प्रमाणात एक्साइज ड्युटी
  • (पेट्रोलवर २११% आणि डिझेलवर ४४३%)
  • काही दिवसांपूर्वी अध्यक्ष राहुल गांधींनी ‘इंधनलाही जीएसटी लागू करण्याची’ मागणी सरकारला मान्य नाही
  • काही महिन्यांपूर्वी अध्यक्ष राहुल गांधींनी ‘इंधनलाही जीएसटी लागू करण्याची’ मागणी सरकारला मान्य नाही.
  • इंधनाच्या एकूण किंमतीपैकी जवळपास ४२% टॅक्स कम्पोनेंट
  • देशात विविध ठिकाणी पूरपरिस्थिती असताना दुष्काळाचा कर कशासाठी?
  • सर्वसामान्यांच्या जीवनावर सर्वाधिक परिणाम, सर्वाधिक हाल होत आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अकोल्याच्या जागेवरून युतीत तणाव निर्माण होणार ?

News Desk

रुपयाचे मुल्य घसरले, उद्धव ठाकरेंचे सरकारवर टिकास्त्र

News Desk

मला कुठेही पाठवा, मी जादू दाखवीन !

News Desk