HW News Marathi
मुंबई

शिवाजी पार्कच्या गणपतीला हापूस आंब्यांची आरास

मुंबई | सालाबादाप्रमाणे यंदाही शिवाजी पार्कच्या उद्यान गणेशाला मुंबईतील सुप्रसिद्ध आंबा विक्रेते असलेल्या देसाई बंधू आंबेवाले आणि त्यांची बहीण तथा सुप्रसिद्ध उद्योजिका मिनल मोहाडीकर यांनी अक्षयतृतीये निमित्त तब्बल २ हजार १०० रत्नागिरी हापूस आंब्यांचा नैवेद्य बुधवारी १८ एप्रिल रोजी बाप्पाच्या चरणी अर्पण केला आहे.

यंदा या गणेशाला २१०० आंबे प्रसाद म्हणून देण्याचे हे देसाई बंधूचे दुसरे वर्ष आहे. हे आंबे मंदिरात एक दिवस ठेवल्यानंतर काही आंबे या ठिकाणी दर्शनासाठी येणा-या भाविकांना दिले जाणार आहेत तर उर्वरीत आंबे अनाथ आश्रमातील मुलांना देण्यात येणार असल्याची माहीती मिनल मोहाडीकर यांनी दिली.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने ‘रोजगारमुक्त’ केले, त्यांनी ‘मोदीमुक्त भारता’ची मुक्ताफळे उधळली

News Desk

रेल्वेत मराठी तरुणांना नोक-या मनसेमुळेच | राज ठाकरे

News Desk

LIVE UPDATES | अंधेरी गोखले ब्रीज

News Desk